vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

ज्ञानदीप कलामंच,ठाणे’तर्फे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा व एकांकिका स्पर्धांसाठी नावनोंदणी सुरू

ज्ञानदीप कलामंच,ठाणे’तर्फे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा व एकांकिका स्पर्धांसाठी नावनोंदणी सुरू

ठाणा प्रतिनिधी-ठाणे: विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी तसेच हौशी कलाकारांना राज्यस्तरीय रंगमंचावर स्वतःची कला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाण्यातील नामांकित संस्था ‘ज्ञानदीप कलामंच,ठाणे’ सज्ज झाली आहे. आगामी मानाच्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा, महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा आणि विविध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी बालकलाकार (वय वर्षे ५ ते १५) आणि खुल्या गटातील अभिनयप्रेमी कलाकारांची (वय वर्षे १६ ते ५०) निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व स्पर्धा डिसेंबर २०२६ आणि जानेवारी २०२७ या कालावधीत पार पडणार असून, निवडक कलाकारांची तालीम नौपाडा, ठाणे येथे घेतली जाणार आहे.

या स्पर्धांचे संपूर्ण नाट्यनिर्मिती, दिग्दर्शन व तांत्रिक नियोजन गेल्या ३० वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत असलेले लेखक-दिग्दर्शक श्री. राजेश एस. राणे आणि त्यांची टीम करणार आहे. संस्थेने आतापर्यंत राज्य बालनाट्य स्पर्धेत अभिनयाची ५ रौप्यपदके, तसेच लेखन, दिग्दर्शन, संगीत व नेपथ्य अशा विविध विभागांत अनेक मानाची पारितोषिके पटकावली आहेत.या स्पर्धांसाठी प्रवेश मर्यादित असून इच्छुक विद्यार्थी, पालक आणि कलाकारांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.· संपर्क व नावनोंदणी: श्री. राजेश एस. राणे (ज्ञानदीप कलामंच, ठाणे· मोबाईल: 9769414362

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत व एकांकिका स्पर्धांसाठी कलाकारांची निवड!ज्ञानदीप कलामंचतर्फे ठाण्यात नावनोंदणी सुरू डिसेंबर-जानेवारीतील स्पर्धांसाठी मिळणार थेट व्यासपीठ ठाणे:

व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी तसेच हौशी कलाकारांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी,वक्तृत्व, अभिनय, नाटक, गायन आणि सांस्कृतिक उपक्रमांची आवड असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच हौशी कलाकारांसाठी राज्यस्तरीय रंगमंचावर स्वतःची कला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ठाण्यातील नामांकित संस्था ‘ज्ञानदीप कलामंच, ठाणे’ आगामी मानाच्या एकांकिका, हौशी राज्य नाट्य स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत,राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होत असून, यासाठी बालकलाकार आणि अभिनयप्रेमी कलाकारांना सुवर्ण संधी.या सर्व स्पर्धा डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीत रंगणार आहेत

३० वर्षांचा दांडगा अनुभव आणि अनुभवी मार्गदर्शन,या स्पर्धांचे संपूर्ण नाट्यनिर्मिती, दिग्दर्शन आणि तांत्रिक नियोजन ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले लेखक-दिग्दर्शक श्री. राजेश एस. राणे आणि त्यांची अनुभवी टीम करणार आहे. श्री. राजेश राणे व त्यांची टीम गेल्या तीन दशकांपासून नाटक, बालनाट्य, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.

प्रमुख अनुभव आणि उल्लेखनीय कार्य:· आकाशवाणीच्या प्रसिद्ध ‘बालदरबार’ आणि ‘गंमतजंमत’ या कार्यक्रमांसाठी १० बालनाट्यांचे यशस्वी सादरीकरण.· जोशी-बेडेकर महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय आणि एस.एन.डी.टी. (SNDT) महिला विद्यापीठासाठी एकांकिकांचे लेखन व दिग्दर्शन.जिल्हाधिकारी कार्यालय (ठाणे) तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्यासाठी विशेष नाट्यलेखन व दिग्दर्शन.· २०१५ ते २०२६ या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धे’त लेखन,दिग्दर्शन,अभिनय,नेपथ्य, प्रकाशयोजना,संगीत,रंगभूषा व वेशभूषा अशा विविध विभागांत मानाची पारितोषिके· महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत अभिनयाची तब्बल ५ रौप्यपदके.· उन्मेष, मृगजळ, एकता, ठाणे महापौर चषक, गोखले स्मृती चषक, जयंत करंडक,अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, बोलीभाषा स्पर्धा आदी राज्यभरातील विविध मानाच्या नाट्यस्पर्धांमध्ये घवघवीत यश.कोणत्या स्पर्धांमध्ये मिळणार सहभागाची थेट संधी

· १) शालेय गट (वय वर्षे ५ ते १५):विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना पैलू पाडण्यासाठी, रंगमंचावरील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्पर्धात्मक बालनाट्यात थेट काम करण्याची संधी.प्रमुख स्पर्धा: महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा, अतुल परचुरे बालनाट्य स्पर्धा, रविकिरण बालनाट्य स्पर्धा, उत्कर्ष मंडळ (जोगेश्वरी) बालनाट्य स्पर्धा व इतर विविध आंतरशालेय स्पर्धा.

· २) खुला गट (वय वर्षे १६ ते ५०):महाविद्यालयीन युवक, नोकरदार आणि नाटकाची आवड असणाऱ्या हौशी कलाकारांना आपली नाट्यकला दाखवण्यासाठी राज्यस्तरीय व्यासपीठ.

प्रमुख स्पर्धा: प्रतिष्ठेची ‘महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा’ आणि राज्यभरातील नामांकित एकांकिका स्पर्धा.

पुढील नियोजन व वेळापत्रक:इच्छुक कलाकार व विद्यार्थ्यांची प्राथमिक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नाटकाची निवड, नाटकाच्या तालमीचे वेळापत्रक आणि स्पर्धांच्या निश्चित तारखा याबाबतची सविस्तर माहिती संबंधित पालक व कलाकारांना कळविण्यात येईल. नाटकांची तालीम नौपाडा ठाणे येथे घेतली जाणार आहे.या स्पर्धांसाठी प्रवेश मर्यादित असल्याने वक्तृत्व, अभिनय आणि नाटकाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी व हौशी कलाकारांनी लवकरात लवकर संपर्क साधून आपली नावनोंदणी निश्चित करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे

· स्पर्धा कालावधी: डिसेंबर आणि जानेवारी· तालीम ठिकाण: नौपाडा, ठाणे (प.)· प्रवेश: नावनोंदणी सुरू (जागा मर्यादित)· नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:श्री. राजेश एस. राणे (ज्ञानदीप कलामंच, ठाणे)मोबाईल: 976941436

फोटो १ कॅप्शन:‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा २०२३’ मध्ये ‘ज्ञानदीप कलामंच, ठाणे’ संस्थेच्या ‘यासनी मायनी यासले’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कार स्वीकारताना लेखक-दिग्दर्शक राजेश राणे व त्यांची टीम.

फोटो २ कॅप्शन:महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना ‘ज्ञानदीप कलामंच’चे बालकलाकार आणि मार्गदर्शक.

00000

संबंधित पोस्ट

बहुचर्चित उदयपूर फाइल्स चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने घातली बंदी..

निर्माते दिग्दर्शक अमित जानी यांचा “काला हिरण: द बैटल फॉर लिगेसी’ या आगामी चित्रपटामुळे बॉलीवूड अभिनेता सलमान खानला दिल्ली हायकोर्टातून मोठा झटका

हॉलिवूडन गरीत मराठी तारे-तारकांचा ‘नाफा’ रेड कार्पेट जल्लोष ! मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव प्रदान !

 97 वा ऑस्कर सोहळा लॉस एंजलिस येथे संपन्न झाला ‘ अनोरा चित्रपटाने जिंकले सर्वाधिक 5 पुरस्कार..

महालक्ष्मी सरसच्या रंगतदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा तडका..

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या” छावा”‘ चित्रपटाची  बंपर कमाई

vishwatmaklokswamivarta