vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकप्रदेश

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा हरियाणात 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा हरियाणात 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

            मुंबई, प्रतिनिधी महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा, वैविध्यपूर्ण लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलावैभव राष्ट्रीयस्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘लोकायन लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे हरियाणातील गुरुग्राम येथे 4 व 5 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे

    महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आणि ‘लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, मुंबई’ यांच्या सहयोगाने हा दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे. गुरुग्राम येथील एसजीटी युनिव्हर्सिटीत 4 व 5 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. या लोकोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध पारंपरिक; तसेच प्रयोगात्म लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविण्यासोबतच लोककला जतन व संवर्धनाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील नामांकित लोककलावंत यात सहभागी होऊन पारंपरिक लोकनृत्य, लोकसंगीत, पोवाडे, भारूड, गोंधळ, लावणी, दिंडी, लोकनाट्य, आदिवासी लोककला; तसेच आधुनिक प्रयोगशील लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा, लोकसंवेदना आणि सामाजिक आशय या कलाविष्कारांतून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत.

‘लोकायन लोकोत्सव’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा एक वैचारिक आणि कलात्मक उपक्रम ठरणार आहे. विविध कलाप्रकारांमधून भारतीय संस्कृतीतील विविधतेत एकता, सामाजिक समरसता आणि लोककलांचे जतन या मूल्यांचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार, यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लोककला राष्ट्रीयस्तरावर सादर करून कलावंतांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नव्या पिढीला लोकपरंपरांशी जोडणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक बळकट करणे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. गुरुग्राम येथील रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव या निमित्ताने घेता येणार आहे.या सांस्कृतिक महोत्सवाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

000

संबंधित पोस्ट

गटाशिक्षण आधिकारी पंस. चिखली श्री रमेश रतन डुकरे पाटिल यांना व त्यांना वाचविण्याऱ्या दोषी आधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई कराआमदार प्रशांत बंब

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

vishwatmaklokswamivarta

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे -उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

जालना-नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांच्या समृध्दी महामार्गाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

अनुकंपा मेळाव्यातून नियुक्ती प्रक्रियेला गती*नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल – जिल्हाधिकारी*

vishwatmaklokswamivarta