vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नरोर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ची अधिकारी, बांद्रा बँड स्टँड वर ‘मन्नत’वर छापा नाही, NCB चं स्पष्टीकरण

  नरोर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ची अधिकारी, बांद्रा बँड स्टँड वर ‘मन्नत’वर छापा नाही, NCB चं स्पष्टीकरण…

मुंबई प्रतिनिधी: मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. अशातच आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी माहिती मिळाली होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं.

आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलंय. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे अशी बातमी एबीपी माझा ने ही दिली आहे.

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी कराव  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

अग्निवीर वायू योजनेसाठी करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध केंद्र, मधमाशापालन व अन्य योजनांविषयीच्या जनजागृती शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जागतिक टपाल दिन व राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येणार

सार्वजनिक आरोग्य विभागाची 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान विशेष,मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम पंधरवड्यात 1 लाख शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

vishwatmaklokswamivarta