
कालकाई इंडिया लिमिटेड च्या संचालकांना अटक करा गुंतवणूकदारांची मागणी घेतली मुंबईत पत्रकार परिषद
मुंबई : प्रतिनिधी कालकाई इंडिया लिमिटेड च्या ठेवीदारांना एकशे पंचवीस कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या संचालकांना तात्काळ अटक करा अशी मागणी कालकाई संपर्क सेवा समितीचे सचिव राजेश सावंत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. कालिकाई इंडिया (इ) लिमिटेड तसेच संपर्क ॲग्रो मल्टीस्टेट को.ऑ.सो. या संस्थेच्या माध्यमातून झालेल्या फसवणूकी संदर्भात न्याय मिळवून देण्यासंदर्भात सदरची पत्रकार परिषद घेण्यात आली.
मुंबई मराठी पत्रकार संघ , याठिकाणी शरद शिरिष्कर अध्यक्ष आणि राजेश सावंत सचिव यांनी, पत्रकार आणि मिडिया सभासदांना मीडिया यांच्याशी संवाद साधताना वर उल्लेख केलेल्या दोन्ही संस्थांचे संचालक असलेले श्री. हेमंत गणपत रेडीज, सौ. मानसी हेमंत रेडीज, श्री. आदित्य हेमंत रेडीज, श्री. अभिनंदन अरूण गांधी, श्री. अरूण गांधी, श्री. विनायक गावणंग तसेच संस्थेचे इतर संचालक मंडळ यांनी दि. ३० मार्च २०११ रोजी कालिकाई इंडिया (इं) लिमिटेड या संस्थेची (ROC) या माध्यमातून तसेच संपर्क ॲग्रो मल्टस्टेट को.ऑ.सो.लि. या संस्थेची २६ डिसेंबर २०१४ रोजी (Agriculture) या माध्यमातून स्थापना करून ग्राहकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोटींच्या ठेवी जमा केल्या. परंतु प्रत्यक्ष परताव्याची वेळ येताच संबंधित संस्थांचे संचालक मंडळ परतावा देण्यास दिरंगाई करू लागले. काही दिवसांनी तर संस्थेचे मुंबई व ग्रामीण भागातील कार्यालय बंद झाल्याचे निदर्शनास आले.
– गरजू व हातावर पोट असणा-या अनेक ग्राहकांनी मोठया विश्वासाने आपल्या उदयाच्या भविष्यासाठी या संस्थामध्ये पैसे भरणा केले होते. परंतु परताव्याची मुदत होऊनही आपले हक्काचे पैसे परत मिळत नसल्याने या सर्व गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
आपणांस कल्पना असेलच गेल्या दिड वर्षातील कोरोना महामारीच्या काळात अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत . लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे . अशा या कठिण परिस्थितीत त्यांनी या दोन्ही संस्थामध्ये भरलेले पैसे या वेळी तरी उपयोगात येतील या आशेवर अनेक गुंतवणूकदार होते.
परंतु संस्थेच्या संचालक मंडळाने उघड या गुंतवणुकदाराची फसवणुक केल्याचे पहायला मिळते आहे . यास्तव प्रकरणावर आवाज उठवून गुंतवणुकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हि समिती निर्माण केली आहे आमची एकच मागणी आहे की पोलीस स्टेशन मध्ये आमची एफ आय आर नोंद घ्यावी तसेच आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढील नोव्हेंबर न महिन्यात आजाद मैदान येथे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे त्यांनी ते निवेदन स्वीकारले आहे असे शरद शिरिष्कर यांनी माध्यमांशी संवाद साधला.



