vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

दिवाळी, लग्नसराईने सोन्याचे दर तेजीकडे! 50 हजार रूपयांकडे वाटचाल.

दिवाळी, लग्नसराईने सोन्याचे दर तेजीकडे! 50 हजार रूपयांकडे वाटचाल..

 

मुंबई प्रतिनिधी ही महिन्यापासून सोन्याचे दर  गडगडल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये फिलगुडचे वातावरण होते. सुरक्षित गुंतवणुक म्हणून सामान्य नागरिक सोन्याकडे पाहतात. घसरलेल्या दरात अनेकांनी खरेदीची संधी साधली. दिवाळी सण व लग्नसराईची लगबग यामुळे पुन्हा सोन्याच्या दराचा आलेख उंचावत आहे.पण ऐन दिवाळीत सोन्याने ५० हजार रूपयांकडे वाटचाल सुरू केली आहे.

पुन्हा सोन्याच्या दराचा आलेख उंचावतोयपंधरा वर्षापुर्वी सोन्याचे दर सात हजार रूपये प्रती दहा ग्रॅम होते. हेच दर गेल्या दोन वर्षापासून पन्नास हजार रूपयांच्या पातळीवर आहे. हा पुर्व अनुभव पाहता गेले दोन महिने सोन्याच्या दराने प्रती तोळा सात ते आठ हजार रूपयांची घसरण झाली होती. ४७ हजार रूपयांपर्यत दर आल्याने ही मंदी अनेकांनी कॅश करत सोने खरेदी केले. सोने खरेदी आता फक्त हौसेसाठी न करता गुंतवणूक म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे सोने खरेदीचा टक्का अनेक पटीने वाढला आहे. सुरक्षित गुंतवणुक म्हणून सामान्य नागरिक सोन्याकडे पाहतात. घसरलेल्या दरात अनेकांनी खरेदीची संधी साधली. दिवाळी सण व लग्नसराईची लगबग यामुळे पुन्हा सोन्याच्या दराचा आलेख उंचावत आहे.

दरात झळाळी येण्याचे संकेतसोन्याचे दर दिर्घकाळ ४५ ते ४७ हजार रूपयांच्या पातळीवर राहिल्याने नागरिकांमध्ये मोठी चलबिचल होती. आता लग्नसराईला सुरूवात होत असल्याने सोने खरेदी वाढणार आहे. लग्नासाठी होणारी खरेदी दरवाढीला पुरक ठरणार आहे. आंतरराष्टीय बाजारातून तज्ञांच्या मते दरात झळाळी येणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळे लवकरच सोने प्रती १० ग्रॅमला ५० हजार रूपयांच्या पुढे असेल असे जाणकार सांगतात.

संबंधित पोस्ट

अकासा’ आकाश प्रवासाला सज्ज, फ्लाइट तिकीट बुकींगला आजपासून सुरुवात

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पीक कर्ज वितरण, बियाणे खते उपलब्धतेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेमध्ये ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी*

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 2 अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने मंदार शिंदेची मेणबत्ती, कापूर व्यवसायवृद्धी …

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरतीसाठी1 ते 8 जुलै कालावधीत ऑनलाईन परीक्षा..