vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद, नांदेड येथून प्रारंभ उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत आढावा, १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण

१ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद, नांदेड येथून प्रारंभ,उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत आढावा, १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण..

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येत आहे. १ नोव्हेंबरला नांदेड येथून आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणारी ही यात्रा ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून, राज्यातील आरोग्यसेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी यात्रेची सांगड घालून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमध्ये ग्रामपातळीवरील सहभाग वाढविण्यावरही भर राहणार आहे.जनतेच्या सूचनांवरून आरोग्य सेवेत सुधारणा,आरोग्य संवाद यात्रा ही केवळ आरोग्य योजनांची माहिती देणारी मोहीम राहणार नसून, नागरिकांच्या अनुभवातून आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वय वाढवून आरोग्य सेवांबाबत उत्तरदायित्व मजबूत करण्यावर भर राहणार आहे.

आरोग्य संवाद यात्रेची ठळक वैशिष्ट्ये,या आरोग्य संवाद यात्रेत १२५ नवीन संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती, ग्राम आरोग्य, पोषण स्वच्छता समिती यापैकी एका समितीसोबत बैठक व चर्चा करण्यात येईल. शासकीय आरोग्य संस्थांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यात येईल.

राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळा व अंगणवाडी यांना भेट देऊन या योजनेचा आढावा घेतील. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत अंगिकृत रुग्णालयांना भेट देऊन खासगी डॉक्टर व रुग्णांशी संवाद साधला जाणार आहे.

गृहभेट व संवाद,पॅलिएटिव्ह केअर, सिकलसेल, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग, कुष्ठरोग, जननी सुरक्षा योजना लाभार्थी, कर्करोग तपासणीतील रुग्ण, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण यांच्याशी संवाद साधण्यात येईल.

रुग्णांना मिळणाऱ्या सेवांचा आढावा,आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत किती प्रमाणात पोहोचतो, आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि रुग्णसेवेत कोणत्या अडचणी येतात, याचा आढावा यात्रेत घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. आरोग्य उपकेंद्रांपासून जिल्हा, महानगरपालिका, स्त्री मनोरुग्ण आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या सेवांचाही आढावा घेतला जाणार आहे.नागरिकांच्या गरजा समजून घेणे, आरोग्य सेवांमधील त्रुटी ओळखणे आणि प्राप्त सूचनांच्या आधारे सुधारणा घडवून आणणे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी आरोग्य संवाद यात्रा राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.

 

००००

 

संबंधित पोस्ट

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा ३५ हून अधिक ढगफुटीच्या घटना; सुमारे ३१ जणांचा मृत्यू…

पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श    प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !

अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांना श्रद्धांजली

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

नेरळ येथे पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाची तत्पर कारवाई