vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मध्य प्रदेश, छतरपूर जिल्ह्यातील बोअरवेलमध्ये 15 फूट खाली अडकलेल्या मुलीची सुटका..

मध्य प्रदेश, छतरपूर जिल्ह्यातील बोअरवेलमध्ये 15 फूट खाली अडकलेल्या मुलीची सुटका…

मध्य प्रदेश : प्रतिनिधी; छतरपूर जिल्ह्यातील दौनी गावात बोअरवेलमध्ये 15 फूट खाली अडकलेल्या मुलीची सुटका करण्यात आलीय. अनेक यशस्वी प्रयत्नांनंतर मुलीला वाचवण्यात यश आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही मुलगी शेतातील बोअरवेलमध्ये पडली होती. माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि लष्कराचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बचावकार्य सुरू केलं. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुलीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलंय.

दिव्यांशी या एक वर्षाच्या चिमुरडीला बोअरवेलमधून  बाहेर काढल्यानंतर, प्रशासनाच्या पथकानं मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मिळालेल्या माहितीनुसार, शेतात राजेश कुशवाह यांनी घर बांधलं असून, तिथं त्यांची पत्नी जानकी कुशवाह आणि एक वर्षाची मुलगी दिव्यांशी राहते. खेळत असताना दिव्यांशी घरापासून काही अंतरावर गेली आणि शेतातीलच उघड्या बोअरवेलमध्ये पडली.

 

बराच वेळ होऊनही दिव्यांशी न दिसल्याने कुटुंबातील लोकांनी आजूबाजूला तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. कुटुंबीय मुलीचा शोध घेत असतानाच, अचानक बोअरवेलच्या आतून दिव्यांशीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. कुटुंबीयांनी प्रथम तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीएम विनय द्विवेदी (SDM Vinay Dwivedi), तहसीलदार सुनीता सहानी, एसडीओपी कमलकुमार जैन, नौगाव स्टेशन प्रभारी दीपक यादव, लुगासी चौकीचे प्रभारी अतुल झा, गारोली चौकीसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

संबंधित पोस्ट

आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज-पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती

आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरणातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील,नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा तालुक्यातील अवसायनातील 103 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

आपल्या वाहनासाठी मनपसंत नंबर करिता परिवहन विभागातील कार्यालयाशी संपर्क साधा…

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रारींच्या-निवारणासाठी हेल्पलाईन कक्ष सुरू –

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे-शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta