vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य केले

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहे. सध्या प्रचार सभांनी जोर धरला असून एकमेकांवर टीका-टिप्पण्या केल्या जात आहेत. एकनाथ खडसें वर टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी ….

बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांची सभा होती. यावेळी त्यांनी थेट आव्हान देत एकनाथ खडसेंना डिवचलं. ”३० वर्ष आमदार राहिलेल्या लोकांना माझं आव्हान आहे की, त्यांनी माझ्या मतदारसंघात धरणगावला येऊन पाहावं. मी काय विकास केला हे त्यांना दिसेल. धरणगावला हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीतर राजीनामा देऊन टाकेन”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. बोदवडच्या रस्त्यांच्या उल्लेख करत त्यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला. अरे हे काय रस्त्ते आहेत का? असा सवाल करत महाराष्ट्राला ज्ञान शिकवता, आधी बोदवडचे रस्ते करा, असं आव्हान त्यांनी खडसेंना

: एकनाथ खडसे काय म्हणाले? -जिल्ह्यात नगरपंचायतच्या निवडणुका आहेत. शिवसेना राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढत आहे. गुलाबराव पाटलांनी निवडणुकीच्या ओघात केलेलं हे भाष्य आहे. गुलाबराव पाटलांना माहिती आहे, की ३० वर्ष नाथाभाऊंनी काय केलं. गेल्या ३० वर्षात मी एकही निवडणूक हरलेलो नाही. त्यामुळे मी किती काम केलं हे जनतेला माहिती आहे. त्यांना हेमा मालिनी का आठवली हे माहिती नाही. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे बोलत असतो. पण, त्यावर मला टीका-टिप्पणी करणं योग्य वाटत नाही, असं एकनाथ खडसे TV 9 मराठी सोबत बोलताना म्हणाले. ‘गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करा’ -हेमा-मालिनीचे गाल आणि रस्त्याची तुलना केल्याबाबत गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. रंगलेल्या गालाच्या मुक्यासंदर्भात मी केलेलं वक्तव्य संदर्भहीन असताना त्यांनी काय गदारोळ घातला होता ते अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. आता महाविकास आघाडी सरकार गुलाबराव पाटलांवर काय कारवाई करणार? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

संबंधित पोस्ट

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष; प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर ‘गणेशोत्सवा’चा भव्य चित्ररथ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता…

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा:राज्यात 11 जागेसाठी मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक 23 टक्के तर बारामतीत सर्वात कमी 14 टक्के मतदान..

vishwatmaklokswamivarta

जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावले….मुंबईत कार्यालयात मोठ्या हालचाली सुरू

vishwatmaklokswamivarta

जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta