vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

 

सातारा, प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असून ही जयंती देशासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साजरी करण्यात येणार आहे. महाराजांच्या जयंती निमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा सातारा शहरातून काढावयाची आहे, याचे दिमाखदार नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा उपनिबंधक संयजकुमार सुद्रिक, नगर पालिका प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जय शिवाजी जय भारत पदयात्रा ही राजवाडा, राजपथ मार्गे, शिवतिर्थ, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशी राहील, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, पदयात्रेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा. जयंती दिवशी संपूर्ण शहर शिवकालीन झाले पाहिजे. यासाठी शिवकालीन साहसी खेळांचे चौकाचौकात आयोजन करावे. पदयात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजुला रांगोळ्या काढाव्यात.

आरोग्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी आरोग्य शिबीराचे आयोजनाबरोबर रक्तदान शिबीर व पदयात्रा मार्गावर जीबीएस आजारा विषयी जनजागृती करावी. योग प्रशिक्षणाचेही आयोजन करावे. या पदयात्रेमध्ये सातारा जिल्ह्यातील कलावंत, क्रीडा संघटक यांच्यासह शिवप्रेमींचाही सहभाग असला पाहिजे. शिवतिर्थावर पोलीस बँन्ड पथकाने मानवंदना द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा भव्य दिव्य अशी झाली पाहिजे यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याबाबत-माजी मंत्री नेते छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; ईडीची याचिका फेटाळली..

vishwatmaklokswamivarta

अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीची-माहिती घेऊन इच्छुकांनी लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे जिल्ह्यात महारेशीम अभियान 2025 चा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे* जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती * जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

vishwatmaklokswamivarta