vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार , सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत  आहेत टीईटी परिक्षा रद्द झाली पाहिजे. परीक्षा पुन्हा नव्याने घेतली पाहिजे. या घोटाळ्याची सीबीआयचौकशी केल्यावर यात सहभागी असलेले अनेक मंत्री समोर येतील. असा आरोप भाजप आमदारचंद्रकांत पाटील यांनी केला

म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार , सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत  आहेत टीईटी परिक्षा रद्द झाली पाहिजे. परीक्षा पुन्हा नव्याने घेतली पाहिजे. या घोटाळ्याची सीबीआयचौकशी केल्यावर यात सहभागी असलेले अनेक मंत्री समोर येतील. असा आरोप भाजप आमदार

चंद्रकांत पाटील यांनी केला

पुणे प्रतिनिधी :विधान परिषद निवडणुकीत नागपूर आणि अकोल्यात मतं फुटल्यामुळे सरकारने विधानसभा अध्यक्ष पदासाठी नियम बदलले आहेत. सरकारला जरी भीती असली तरी नियम बदलून चालत नाही. 12 आमदारांच्या निलंबनाची केस प्रलंबित असताना अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं चुकीचे आहे. बहुमताच्या जोरदार या सरकारने महाराष्ट्राची वाट लावलीय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या केवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची प्रिय आहे. महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक झालं आहे. त्यांच्या कामगिरीसाठी आता नवीन प्राणी शोधावा लागेल, असा घाणाघातही भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केला आहे.

दादागिरी चालणार नाही

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परखड मत व्यक्त करत सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्टपूर्ण होणार नसल्याचे नुकतेच अजित पवारांनी स्पष्ट केले. मात्र अजित पवार दादागिरीने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न रेटण्याचा प्रयत्न करतायत,पण तसं चालत नाही. परखड मतांने सर्वच कामे होत नाहीत असा टोलाही पाटील यांनी पवार यांना लगावला आहे.

टीईटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत

म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार झाला आहे. सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत टीईटी परिक्षा रद्द झाली पाहिजे. टीईटी परीक्षा पुन्हा नव्याने घेतली पाहिजे. या घोटाळ्याची सीबीआयचौकशी केल्यावर यात सहभागी असलेले अनेक मंत्री समोर येतील. म्हणूच महाविकास आघाडी सरकार सीबीआयची चौकशीला घाबरत आहे. भाजप कोणालाही पाठीशी घालणार नाही. या घोटाळ्यात आमचा कार्यकर्ता दोषी असेल तर त्यांना फाशीवर लटकवा असे मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक*प्रयागराज येथील महाकुंभातील सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनीचे उद्घाटन !**सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य ! – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज*

vishwatmaklokswamivarta

हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके’चे प्रकाशन माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते 

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबद्दल रावसाहेब दानवेंची महत्त्वाची घोषणा.

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार! 10 जणांचा बळी, 1178 कोंबड्या दगावल्या; पीक-फळबागांना फटका…

मोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवी,केंद्र -राज्य भेदभाव न करता मदत द्या, शिवसेनेची मोदींकडे मागणी, राज्याचे  मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींना मदतीचं आवाहन.

हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 10 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन