vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुण्यात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांवर हल्ला : शिवसेना कार्यकर्ते पोलिसांसमोर हजर

पुण्यात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांवर हल्ला : शिवसेना कार्यकर्ते पोलिसांसमोर हजर…

प्रतिनिधी पुणे: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे शिवसेना कार्यकर्ते  पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पुण्यात शिवसैनिकांच्या अटकेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत. शहरप्रमुख संजय मोरे कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता.

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे आणि इतर कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु झाली आहे. त्यांनतर त्यांना न्यायलायात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना जामीन मिळणार की कोठडी याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, न्यायव्यवस्था आणि महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ठेऊन आम्ही सर्व शिवसैनिक उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे सकाळी 10 वा उपस्थित राहणार आहोत, अशी माहिती पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली होती. त्यानुसार संजय मोरे आणि कार्यकर्ते आज पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले.

 

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या झटापटीत खाली पडून त्यांना दुखापत झाली होती. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.  माझी हत्या करण्याचा प्लँन होता, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गतपरंपरागत कृषी विकास योजनेसाठी२१६.६७ लाख रुपये निधी वितरित

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली अभिनेता गोंविदा यांची भेट, राजकारण, चित्रपटांवर गप्पा आणि कविताही सादर …

vishwatmaklokswamivarta

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक, कथीत फोन टॅपींग प्रकरण

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने-घनसावंगी येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन…· नागरिकांनी महामेळाव्याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळआणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सामन्यांच्या खिशाला पुन्हा फटका; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्या