vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

BMC – सेनेच्या पराभूत उमेदवार एक महिन्यासाठी झाल्या नगरसेवक…

BMC – सेनेच्या पराभूत उमेदवार एक महिन्यासाठी झाल्या नगरसेवक…

 

मुंबई – सध्या मुंबई महापालिकेत (BMC Election 2022) निवडणुकांची धुमशान सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसह इतर पक्षांनीही मोर्चेबांधणीची तयारी सुरु केली आहे. मनसे, शिवसेना, भाजप (BJP) यांच्यात खरी चुरस दिसणार आहे. दरम्यान, आता मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची संख्या ९६ वरून ९७ होणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ही संख्या वाढणार आहे.

महापालिकेतील भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळणाऱ्या उमदेवराला नगरसेवक पद देण्याचे आदेश पालिका न्यायालयाने दिले आहेत. प्रभाग क्रमांक १५९ मधून २०१७ ला भाजपचे प्रकाश मोरे निवडून आले होते. तर शिवसेनेच्या (Shivsena) कोमल जामसांडेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. दरम्यान प्रकाश मोरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार कोमल जामसांडेकर यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीवर निर्णय देताना लघुवाद न्यायालयाने प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द केलं आहे.

 

संबंधित पोस्ट

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

विमाशि संघाचे मंगळवारी विदर्भस्तरीय धरणे आंदोलनशिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन..

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत 6 हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन.चैत्यभूमी येथेही ज्ञानस्मारकाची माहिती देणारा स्टॉलचैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाची ज्ञानस्मारकात थेट प्रक्षेपण व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या निवडीची विधानसभेत घोषणा विधिमंडळ विशेष अधिवेशन २०२४-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह १७३ विधानसभा सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ..

vishwatmaklokswamivarta

बँकांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा   -जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

🌹आज चे पंचांग 🌹🌝