vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महापौर म्हणून शेवटचा संवाद साधणाऱ्या किशोरी पेडणेकर,

महापौर म्हणून शेवटचा संवाद साधणाऱ्या किशोरी पेडणेकर,..

 

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेची  मुदत आज संपतेय. मुंबई महापालिकेवर उद्यापासून प्रशास नेमण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने  दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही आस्थानिक संस्थेला मुदतवाढ देता येत नाही. मुदत संपल्यानंतर लगेच निवडणूक घेणं शक्य होणार नाही. 

आज मुंबई महापालिकेची मुदत संपत असून निवडणूक एप्रिल अखेर किंवा मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७ मार्चनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासन नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार उद्यापासून महापालिकेवर प्रशासक नेमला जाईल.

 

त्याआधी आज महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज महापौर म्हणून आपलं शेवटचं भाषण केलं. मुंबईकर निश्चितच शिवसेनेसोबत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं आहे. आघाडी सरकार म्हणून काम करत आहेत त्यामुळे लोकांच्या आशिर्वादाने मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकणारच असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

 

उद्यापासून नवी इनिंग सुरु होणार, लोकांसाठी काम करत राहणार, माझी टर्म संपली पण पत संपलेली नाही. मुंबईकरांना अर्ध्यावर सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

 

जोपर्यंत दुसरा महापौर निवडून येत नाही तोपर्यंत मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार, मी मुंबईला असंच सोडणार नाही मी काम करत राहणार, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

ज्यांच्यावर धाडी पडणार होत्या ते भाजपमध्ये गेले, ते शुद्ध झाले, म्हणजे पर्याय असा आहे की एकतर आमच्या या किंवा ईडी, सीबीआयच्या धाडी घ्या. पण आम्ही सैनिक आहोत, आम्ही घाबरणार नाही, कायदा आणि कागदाची ही लढाई आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

 

संबंधित पोस्ट

राज्यातील एका जोडप्याचं ISIS संबंध, NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर…

दापोली  येथील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते वाचवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या..

vishwatmaklokswamivarta

पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दाणा चक्रीवादळ वादळ प्रभावीत; आयएमडीकडून मुसळधार पावसाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta