vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

Google Doodle Nowruz 2022: पारसी नववर्ष नवरोज निमित्त गूगल डूडल बनवत सर्च इंजिनकडून हटके शुभेच्छा

Google Doodle Nowruz 2022: पारसी नववर्ष नवरोज निमित्त गूगल डूडल बनवत सर्च इंजिनकडून हटके शुभेच्छा…

मुंबई प्रतिनिधीपारसी नववर्ष ( Navroz 2022) निमित्त गूगलने खास डूडल (Google Doodle) साकारत आपल्या होमपेजच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. पारसी समाजातील परंपरांनुसार ‘नवरोज’ (Navroz) हा वसंत ऋतूतील पहिला दिवस असतो. त्यामुळे गूललनेही या अत्यंत आनंदाच्या आणि वेगळ्या दिवसानिमित्त जगभरातील पारसी समूहाला शुभेच्छा दिल्या आहेत.

पारसी नववर्ष ( Navroz 2022) निमित्त गूगलने खास डूडल (Google Doodle) साकारत आपल्या होमपेजच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. पारसी समाजातील परंपरांनुसार ‘नवरोज’ (Navroz) हा वसंत ऋतूतील पहिला दिवस असतो. त्यामुळे गूललनेही या अत्यंत आनंदाच्या आणि वेगळ्या दिवसानिमित्त जगभरातील पारसी समूहाला शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज निमित्त सादर करण्यात आलेल्या या डूडलध्ये (Google Doodle Nowruz 2022) रंगांचा उत्सव दाखवला आहे. ज्यात अनेक रंगीबेरंगी फुले आणि मधमाशा दिसत आहेत. शिवाय गिटार हे वाद्यही पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पाहताक्षणीच लक्षात येते की वसंत ऋतू (Spring Season) सुरु झाला आहे.

 

जगभरातील पारसी लोक आज आपला हा खास सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. नवरोझ हा एक फारसी भाषेतील शब्द आहे. जो नव आणि रोज या दोन शब्दांचे एकत्रीकरण करुन केला जातो. नव म्हणजे नवा आणि रोज म्हणजे दिवस. त्यामुळे नवरोजचा अर्थ असा की, दररोज नवा दिवस. नवरोज साजरा करण्याचा इतिहास हा पाठिमागील जवळपास 3000 वर्षांपेक्षाही जूना आहे. पारसी समूह या दिवसाला पतेती किंवा जमशेदी नावानेही साजरा करतो किंवा ओळखतो

पारसी समूह नवरोज दिनानिमित्त भल्या पहाटे उठतो. लहान मुलेही सकाळी सकाळी छान तयार होतात. नवे कपडे घालतात. या दिवशी घर साफ करण्याचीही पद्धत आहे. पारसी मंदिरात या दिवशी विशेष प्रार्थना होते. ज्यात पारसी समूहातील लोक सहभागी होतात. एकमेकांन नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या जातात. सांगितले जाते की, शाह जमशेदजी यांनी पासशी धर्मामध्ये नवरोज साजरा केला जाण्याची शक्यता आहे. थंडीनंतर वसंत ऋतूचे आगमन होते आणि चैत्रपालीवने निसर्ग हिरवाईने नटू लागतो.

 

संबंधित पोस्ट

पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल; मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हे?

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

आज गुढीपाडवा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा!मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात

आम आदमी पार्टीचे माजी मत्री सत्येंद्र जैन यांना तरुंगात मसाज,

vishwatmaklokswamivarta