vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

पोलिस असल्याची बतावणी; महिलेने स्वत:वरच छापा टाकायला लावून उकळले पैसे

पोलिस असल्याची बतावणी; महिलेने स्वत:वरच छापा टाकायला लावून उकळले पैसे…

 

ठाणे प्रतिनिधी एका महिलेने तिच्या तीन साथीदारांच्या मदतीने एका ५७ वर्षांच्या पुरुषाला लैंगिक संबंधांच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळल्याची घटना घडली आहे. तिने त्या पुरुषाला भाईंदर (पूर्व)मधील एका फ्लॅटमध्ये लैंगिक संबंधाच्या बहाण्याने नेलं. त्यानंतर या महिलेने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीनेच त्या पुरुषाला फसवलं आहे. तिच्या साथीदारांनी पोलिस असल्याची बतावणी करत त्या फ्लॅटवर छापा टाकून त्या व्यक्तीकडून 70 हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर या चौघाही आरोपींना सापळा रचून नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या ४५ दिवसांपासून ज्योती नावाची एक महिला फोन करून त्याला भेटण्याची विनंती करत होती. 23 मार्च रोजी तिने त्याला भाईंदर (पूर्व) मधील शिर्डीनगर येथील एका इमारतीतील फ्लॅटवर बोलावले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचं दिसून आलं. २५ मार्च रोजी त्या फसवणूक झालेल्या व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली आहे.त्या दिवशी फ्लॅटवर या महिलेने त्याच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच तीन पुरुष पोलिस असल्याचा बतावणी करत खोलीत घुसले. त्यांनी त्या व्यक्तीवर देह व्यापाराचा आरोप अटक केली जाण्याची धमकी दिली आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली.

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर हल्ल्याचा कट फसला, लॉरेन्स टोळीच्या 4 सदस्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक 

भिवंडीत  गुजरात  येथून कंटेनर व टेम्पोद्वारे विक्रीसाठी आलेला प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पोलिसांनी आज जप्त

vishwatmaklokswamivarta

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील दोन आरोपींना 12 ऑगस्ट पर्यंत एनआयए कोठडी

धक्कादायक:नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर करून कॅन्सरवरील बनावट औषधांची विक्री; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई….

बेपत्ता मुलाविषयी माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हरवलेली मुलगी आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta