vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

*उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ?   जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने

*जागतिक आरोग्य दिन*  *उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ?*

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी , आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्ट्या सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य.

समजा एखादी व्यक्ती शरीर व्याधी मुक्त आहे , त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. तसेच तो कायमस्वरूपी रागीट होऊन आदळआपट करत असतो, लालची किंवा लोभी पणा करत असेल तर अश्या व्यक्तीला निरोगी म्हणता येणार नाही.

आपल्याला जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्य सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच भर दिला पाहिजे तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू…

 

*मानसिक आरोग्य*

मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण , तणाव, चिंता , नकारात्मक विचारसरणी ला आपल्या मनात स्थान नसेल .

 

*भावनिक आरोग्य*

भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं राग लोभ ,अहंकार व तिरस्कार ला आपल्याला जीवनात स्थान नसेल.

 

*अध्यात्मिक आरोग्य*

अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवाद ने राहणं म्हणजेच अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीतीरी वर विश्वास असणे. व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरा चा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ उत्तम पाहिजे.

 

*शारीरिक आरोग्य*

जेव्हा आपल शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधी पासून व शारीरिक इजे व अनियमितते पासून मुक्त असते अश्या स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखल् जात हाच आरोग्याचा मुलमंत्र आहे.

संबंधित पोस्ट

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी· ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

आरोग्य सेवा सुलभ, सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

vishwatmaklokswamivarta

शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्याव्यात-औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

चुकीच्या सवयींमुळे तसेच दफ्तराच्या ओझ्यामुळे लहान मुलांना पाठदुखीचा त्रास होत होतो; परंतु लॉकडाऊनमध्ये दफ्तराचे ओझे कमी झाले असले, तरीही मोबाईल, कॉम्प्युटर तसेच लॅपटॉपच्या अतिवापरामुळे लहान मुलांना पाठदुखी, मानदुखी व मणक्याच्या आजारां

डेंग्यू आजार : सावधानता बाळगण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन…