vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ नील सोमय्या यांनाही न्यायालयाचा दिलासा…

 किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ नील सोमय्या यांनाही न्यायालयाचा दिलासा…

[ मुंबई प्रतिनिधी : INS विक्रांतच्या कथित मदतनिधी घोटाळाप्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यानंतर त्यांचे पूत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनाही उच्च न्यायालायाने दिलासा दिला आहे. तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

 

25 ते 28 एप्रिलदरम्यान चौकशीला हजर राहण्याचे निर्देश देतानाच चौकशीला हजर राहून तपासात सहकार्य करावं असं कोर्टाने नील सोमय्या यांना सांगितलं आहे.

 

संजय राऊत यांनी केला होता आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत मदतनिधीचा अपहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्यावर केला होता. सेव्ह विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य लोकांकडून 58 कोटी रुपये गोळा केले आणि नंतर ते पैसे नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत मनी लॉन्ड्रींग केले, असा आरोप संजय राऊत यानी केला होता.

 

तसंच एका माजी सैनिकांनेही याचप्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

संबंधित पोस्ट

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री कु. अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

निवडणूक आयोगाची नवी डिजिटल प्रणाली-इंडेक्स कार्ड व आकडेवारी अहवालांची जलद निर्मिती..

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप : भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत -आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र; कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन

vishwatmaklokswamivarta