vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

यमुनोत्री महामार्ग बंद; 10 हजार प्रवासी, भाविक अडकले

यमुनोत्री महामार्ग बंद; 10 हजार प्रवासी, भाविक अडकले…

उत्तराखंड प्रतिनिधी

चारधाम यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची ऑफलाइन नोंदणी बंद करण्यात आली आहे. नोंदणीशिवाय यात्रेकरूंना ऋषिकेशच्या वर जाऊ दिले जात नाही.

उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चार धाम यात्रेमध्ये (Char Dham Yatra) पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील स्यानाचट्टी आणि रणचट्टी दरम्यानचा रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग काल 20 मे ला संध्याकाळी मोठ्या वाहनांची रहदारी बंद करण्यात आली आहे. सध्या यमुनोत्री परिसरात अनेक भाविक, प्रवासी अडकल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान दामटा ते जानकीचट्टी दरम्यानचे प्रवासी देखील यमुनोत्रीचा मार्ग कधी खुला होणार याची वाट पाहत आहे. युद्धपातळी काम करून हा मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, यमुनोत्री मंदिराकडे जाणार्‍या हायवे ची सेफ्टी वॉल कोसळल्याने सुमारे 10 हजार जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. आणि नजिकच्या भागात 10 हजार जण अडकले आहेत. रस्ता पुन्हा खुला होण्यासाठी 3 दिवस लागू शकतात त्यामुळे आता मोठ्या वाहनांमधून लहान वाहनांमध्ये नागरिक घेऊन त्यांना बाहेर काढले जात आहे.

चारधाम यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची ऑफलाइन नोंदणी बंद करण्यात आली आहे. नोंदणीशिवाय यात्रेकरूंना ऋषिकेशच्या वर जाऊ दिले जात नाही. अशा परिस्थितीत ऋषिकेश, हरिद्वारसह परिसरात साडेनऊ हजार यात्रेकरू अडकून पडले आहेत. सध्या या सार्‍यांना हॉटेल, धर्मशाळा, लॉजमध्ये तात्पुरते हलवण्यात आल्याने ऋषिकेश आणि हरिद्वार पूर्णपणे खचाखच भरले आहेत.

 

संबंधित पोस्ट

जालन्यात मोकाट कुत्रे व नागरी समस्यावर शिवसेना आक्रमक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलनभवानीनगर येथे मोकाट कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके..

vishwatmaklokswamivarta

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते  अनावरण..

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत  – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान उद्योग संस्थेच्या संचालकांची आजपासून दोन दिवसीय सभा

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पुर्व प्रशिक्षणाचे आयोजन· 23 जानेवारीला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखत

vishwatmaklokswamivarta

आई बाबा प्लिज मतदान करा……!**गिरवी ता फलटण येथील विद्यार्थ्यांचे पत्रद्वारेआवाहन : स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती* 

vishwatmaklokswamivarta