
बी.डी.डी.चाळीतील 30 वर्षे वास्तव्य असलेल्या पोलीस बांधवांना कमी किंमतीत घरे मिळावीत –
बीडीडी चालीचा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तर महाविकास आघाडी सरकार ने सोडवला
– डॉ.राजू वाघमारे
मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पोलिंसाना घरे मिळावीत यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्टेटमेंट दिल्या परंतु कोर्टात जाऊन पोलीस पत्नींनी घरासाठी केलेल्या कोर्ट केस मध्ये शासन घरे द्यायला तयार आहे असे प्रतिज्ञापत्र मात्र त्यांनी कधी कोर्टात दिले नाही.फक्त कोर्टाच्या बाहेर फसव्या घोषणा करण्याचे काम सुरु ठेवले आज ते याच प्रकारे लोकांची दिशाभूल करीत आहेत हे लोक चांगलेच ओळखून आहेत म्हणून त्यांना धड़ा शिकवतील अशी तिखट टीका डॉ.राजू वाघमारे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज ता.25 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात केली.निमित्त होते ते बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिस कुटुंबियांना 50 लाखांपेक्षा कमी किंमतीत घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस व आमदार कालिदास कोलंबकर यांच्या येत्या दोन दिवसात होणाऱ्या बीडीडी चाळीच्या आन्दोलनाचा पर्दाफाश करण्यासाठी.
यावेळी त्यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे –
भाजप आमदार कालिदास कोळंबकर पत्रकार परिषदेत धडधडीत खोटे सांगतात कि,1980 पासून मी बीडीडी चाळीतील पोलिंसाच्या घरासाठी भांडत आहे. जेव्हा आमदार कोळंबकर 1980 साली 28 वर्षांचे होते त्यावेळीस त्यांना कोणी ओळखत देखील नव्हते.ते 1990 साली आमदार झाले तेव्हा पासून आज पर्यंन्त गेल्या 42 वर्षात बी.डी.डी. रहिवाशांच्या पुनर्बांधणीसाठी व पोलिंसाच्या घरासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केलेले नाहीत.
# डॉ राजू वाघमारे यांनी पोलीस बांधव यांना घरे मिळण्यासाठी दिलेल्या प्लॅन प्रमाणे 30 वर्षे बी.डी.डी.चाळीत राहणाऱ्या पोलिंसाना मोफत घरे व 30 वर्षापेक्षा कमी वर्ष राहणाऱ्या पोलिंसाकडून त्याच प्रमाणात बांधकाम खर्च घेणे व बांधकाम खर्चाची मर्यादा 16 लाख रुपये ठेवली होती त्याची घोषणा केली.पण त्या प्लॅनच्या अंमलबजावणी साठी ना डॉ.राजू वाघमारे यांना बोलविले, ना म्हाडा अधिकारी यांना बोलविले, ना शासकीय बैठक घेतल्या होत्या.
तसेच आमदार कोळंबकर हि पोलिंसाकडून रेडीरेकनरच्या भावाने पैसे घ्या असे स्पष्ट सांगत होते.रेडीरेकनरच्या भावा प्रमाणे त्यावेळी घराची किंमत 1 करोड होती.तसेच गेल्या 42 वर्षात या पुनर्बांधणी प्रकल्पात पोलीस बांधवांच्या घरासाठी कोणतीही योजना किंवा मोफत घराची मागणी कोळंबकर यांनी केली नाही आज मोठ्या आवेशात मोफत घराची मागणी कोळंबकर करत आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस व आमदार कोळंबकर सांगत आहेत त्यावेळेस चे पोलीस आयुक्त संजय बर्वेजी यांनी घराचा दर 30 लाख ठरवला होता व जाहीर कारण्याच्या 2 दिवस आधी आचारसंहिता लागू झाली असे धादांत खोटे भाजप कडून सांगितले जाते.
याचा पुरावा म्हणजे त्यावेळेचे पोलीस आयुक्त बर्वेजी यांची नेमणूक 2019 ला झाली त्यांना 2 वेळा मुदतवाढ देण्यात येऊन ते फेब्रुवारी 2020 ला सेवानिवृत्त झाले परंतु आचारसंहिता 21 सप्टेंबर 2019 ला लागली मुख्यमंत्री यांना आचार संहिता केव्हा लागणार पूर्व अंदाज असतो तर पोलीसांना हाऊसिंग घर 30 लाखात देणार हे आधीच जाहीर का केले नाही याचे कारण पोलीस हाऊसिंगच्या योजना आणि कार्य हे शासनाच्या महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग आणि वेल्फेअर याच मार्फत केले जाते व त्याचे प्रमुख राज्याचे गृहविभागाचे डिजी असतात मुंबईचे आयुक्त नसतात इतके धादांत खोटे बोलणे भाजपने आतातरी बंद करावे.
पोलिंसाना 50 लाखात घर हे फक्त घराचा बांधकाम खर्च नसून त्या घरासाठी लागणाऱ्या सर्व सुखसोयीमपाणी,गटार, वीज,मैदाने,रस्ते,पार्किंग व त्या घरात राहणाऱ्या सदस्यांना लागणाऱ्या सुखसोयी व्यायामशाळा,गार्डन,हॉल इत्यादी ह्या सर्व गोष्टी मिळून घर बांधले जाते आणि घर बांधताना या सर्व गोष्टींचा विचार केला जातो,या सर्व गोष्टींचा विचार केला असता 1 कोटीच्या वर घराची किंमत जाते,महाविकास आघाडी सरकारने त्यात 55 टक्के सवलत देऊन 50 टक्के वर आणली आहे आम्ही देखील अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाच्या वतीने पोलीस बांधवांना कमी रकमेत घर मिळावे त्यांच्यावर पैशांचा किंवा कर्जाचा बोजा वाढू नये यासाठी सरकारने मदत करावी, निर्णय घ्यावा यासाठी मागणी केली आहे.आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडी सरकार सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी स्थापन झाले आहे.त्यामुळे सरकार दिलासा दायक निर्णय घेईल याची खात्री आहे.
महाविकास आघाडी धाडसी निर्णय घेऊन बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या सर्व मागण्या मान्य करून तसेच बीडीडी चाळीतील पोलिंसाना मालकी हक्काचे घर देण्याचे स्पष्ट केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रीय नेते शरद पवार,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने लाखो रहिवाशांच्या घराचा प्रश्न सुटला आहे.



