vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महत्त्वाची बातमी; मुंबई महापालिका निवडणुकांआधी आरक्षणासंदर्भातील मोठी घडामोड

 महत्त्वाची बातमी; मुंबई महापालिका निवडणुकांआधी आरक्षणासंदर्भातील मोठी घडामोड…

 

मुंबई प्रतिनिधी गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्याच्या आणि मुख्य म्हणजे मुंबई शहराच्या राजकीय पटलावर ज्याची चर्चा सुरु होती, त्या महानगरपालिका निवडणुकांसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही माहिती आहे निवडुकांतील आरक्षणासंदर्भातली.

रंगशारदा सभागृहामध्ये मंगळवारी पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत निघणार आहे. यंदा महापालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे.

 

परिणामी सध्या सर्व पक्षांचे उमेदवार गॅसवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आता कोणत्या गटाला निवडणुकीत नेमकं किती आरक्षण मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ देणार नाही असे सांगत विरोधी पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यास विरोध केला होता. तर राज्य सरकारनेही ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यत निवडणूका घेणार नाही अशी भूमिका घेतली होती.

 

काय आहे प्रभाग विभागणी?

अनुसूचित जातींसाठी 15 प्रभाग

अनुसूचित जाती महिलांसाठी 8 प्रभाग

अनुसूचित जमातींसाठी 2 प्रभाग

अनुसूचित जमात महिलांसाठी 1 प्रभाग

खुल्या वर्गासाठी 219 प्रभाग

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम

vishwatmaklokswamivarta

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

vishwatmaklokswamivarta

नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस५५२ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

आता QR कोडद्वारे तक्रार-सुचना नोंदवा;प्रशासनाचे डिजीटल पाऊल

अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत, मुलगा ऋषिकेशला समन्स, नागपुरातील घराबाहेर शुकशुकाट…

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण