
वटपौर्णिमा सणानिमित्त खास रांगोळी डिझाईन्स काढून वाढवा तुमच्या अंगणाची शोभा, पाहा व्हिडीओ…
महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी
हिंदू धर्मात रांगोळीचे खूप महत्व असते. प्रत्येक सणाला स्त्रिया आपल्या अंगणात सुरेख रांगोळी काढतात. बदलत्या ट्रेन्डनुसार, रांगोळीत सणाची प्रतिमा साकारली जाते. व्हिडिओज पाहून तुम्ही तुमच्या अंगणाची शोभा नक्की वाढवू शकता. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित महिलांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करतात आणि आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया साज शृंगार करतात. या दिवशी काही स्त्रिया सलग तीन दिवस उपवास करतात. तर काही स्त्रिया वटपौर्णिनेच्या दिवशी उपवास करतात. हिंदू धर्मात प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते. हिंदू धर्मात रांगोळीचे खूप महत्व असते. प्रत्येक सणाला स्त्रिया आपल्या अंगणात सुरेख रांगोळी काढतात. बदलत्या ट्रेन्डनुसार, रांगोळीत सणाची प्रतिमा साकारली जाते. खालील व्हिडिओज पाहून तुम्ही तुमच्या अंगणाची शोभा नक्की वाढवू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत. ज्या सध्या आणि सोप्या आहेत. ज्या तुम्ही झटपट काढू शकतात.
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हादेखील वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यामागचा एक हेतू आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वटवृक्षाची पूजा करून ‘मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, अशी प्रार्थना करतात.



