vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

शिवसेनेला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव’ रवी राणा यांचा गंभीर आरोप

‘शिवसेनेला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव’ रवी राणा यांचा गंभीर आरोप

मुंबई प्रतिनिधी

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी विधानपरिषदेसाठी मतदान केलं आहे. रवी राणांविरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढलंय. अटकेच्या शक्यतेमुळे रवी राणा मतदानासाठी येणार की नाही, अशी चर्चा होती. पण रवी राणा मतदानासाठी पोहोचले. त्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केलाय.

 

रवी राणा यांचा आरोप

आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी अटक वॉरंट काढून आपल्या मुंबईतल्या घरी पोलीस पाठवले. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी त्यांना सहकार्य केलं. विधानपरिषद निवडणुकीत माझ्यावर दबाव टाकण्यासाठी, मला थांबवण्यासाठी आणि शिवसेनेला मतदान झालं पाहिजे यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

 

संजय राऊत माझ्यावर बोलले की रवी राणा आमच्या पायाशी, पण एक लक्षात ठेवा जनतेने तुम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलं, पण 56 वर्षांनंतर पहिल्यांदा या जनतेला तुम्ही धोका दिला आहे. त्यामुळे जनताच तुम्हाला पायाशी घेईल हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर रवी राणा यांनी दिलं.

 

बजरंगबलीच्या कृपेने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीने भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वासही आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला. www.crimesoch.asia

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष अजित पवारांच्या तटकरेंना सूचना- भुजबळांचा राजीनामा घ्या..

vishwatmaklokswamivarta

ठाकरे गटाचे खासदार: संजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचल्याची चर्चा…

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून ‘या’ उमेदवारांना वगळणार, सूत्रांची माहिती  

महाराष्ट्राच्या सत्तेत अजित पवारांच्या एंट्रीनंतर शिंदे गट नाराज असल्याची चर्चा ? मंत्री दीपक केसरकर यांनी केला खुलासा…

खा. राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य; खा. अनिल बोंडे व आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन..

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांसाठी काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेअनिल बाबर हे जनसामान्यांशी, मातीशी जोडलेले नेते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार अनिल बाबर पंचत्वात विलीन : मान्यवरांकडून भावपूर्ण श्रध्दांजली

vishwatmaklokswamivarta