vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीमध्ये BJP ला पाचही जागांवर यश; महाविकास आघाडीला मोठा धक्का

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीमध्ये BJP ला पाचही जागांवर यश; महाविकास आघाडीला मोठा धक्का….

मुंबई प्रतिनिधी

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते, तर भाजपने पाच उमेदवारांना तिकीट दिले होते. अशाप्रकारे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 11 उमेदवार निवडणूक लढत होते.

गेले अनेक दिवस संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार जिंकले असून, भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. याशिवाय राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे भाजपकडून महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले असून, चंद्रकांत हंडोरे यांचा परभाव झाला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते, तर भाजपने पाच उमेदवारांना तिकीट दिले होते. अशाप्रकारे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 11 उमेदवार निवडणूक लढत होते. विधान परिषदेच्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. त्याचवेळी या वर्षाच्या सुरुवातीला भाजपच्या एका सदस्याचा मृत्यू झाल्याने दहाव्या जागेवर निवडणूक झाली. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते

रामराजे निंबाळकर- 28

एकनाथ खडसे- 29

आमश्या पाडवी- 26

सचिन अहिर- 26

प्रवीण दरेकर- 29

राम शिंदे-30

श्रीकांत भारतीय- 30

उमा खापरे- 27

प्रसाद लाड- 28

भाई जगताप- 26

महत्वाचे म्हणजे विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांना 134 मते मिळाली आहेत. सध्या विधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत, तर मित्रपक्षांच्या पाठिंब्यानंतर हा आकडा 113 वर पोहोचला आहे. मात्र आताच्या निकालानुसार महाविकास आघाडीची 21 मते फुटली आहेत. ही मते नेमकी कुणाची. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची 52 मते पडली, मग शिवसेनेची हक्काची 3 मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मते फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 मते मिळाली आहे

संबंधित पोस्ट

श्रीक्षेत्र गाणगापूर मध्ये दत्त जयंती निमित्त सजलं मंदिर! दत्त जयंती सर्व देशवासीयांना  हार्दिक शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४-दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ……

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री मकरंद जाधव पाटील· पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली.

बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- कृषी मंत्री धनंजय मुंडे

vishwatmaklokswamivarta

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून दोषसिद्धी वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- पोलीस दलाच्या बैठकीत घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – बेपत्ता महिलासंदर्भात गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा- मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे- संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमिवर यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना