vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशामध्ये | गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

देशामध्ये | गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा..

 

: मुंबई प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी जुलै महिन्याची सुरूवात चांगली झाली आहे. केंद्र सरकारने LPG Gas Cylinder च्या किंमतींमध्ये कपात केली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलो गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये 198 रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती 1 जुलै म्हणजेच आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑइल ऑइलचा 19 किलोग्रॅमचा कमर्शिअल गॅस सिलिंडर आता 2021 रुपयांना मिळणार आहे. याआधी 1 जून रोजी किंमतींमध्ये 135 रुपये कमी करण्यात आले होते. 14.2 किलोच्या घरघुती सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

 

सिलिंडरच्या किंमती?

 

19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून 200 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

दिल्लीत आता 19 किलोचा सिलेंडर 2219 ऐवजी 2021 रुपयांना मिळणार आहे.

कोलकातामध्ये 2322 रुपयांऐवजी 2140 रुपयांना मिळणार आहे.

मुंबईत 2171.50 रुपयांऐवजी 1981 रुपयांना मिळणार आहे.

चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 2373 रुपयांऐवजी 2181 रुपयांना मिळणार आहे.

तेल कंपन्यांनी दिलेल्या या सवलतीचा परिणाम आगामी काळात महागाईवर दिसून येईल. यापूर्वी 1 जून रोजी 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 135 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्याचवेळी मे महिन्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर दोनदा वाढवण्यात आले होते.

 

7 मे रोजी घरगुती सिलिंडरचे दर (LPG Cylinder Price) 50 रुपयांनी वाढले होते. त्याच वेळी, 19 मे रोजी 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, सध्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.

 

200 रुपये अनुदान

1 जूनपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु, काही दिवसांपूर्वीच जनतेला मोठा दिलासा देत सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये गॅस सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला 12 सिलिंडरवर मिळणार आहे.

 

संबंधित पोस्ट

हिजाब प्रकरण तापणार; पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद..

vishwatmaklokswamivarta

महत्त्वाचा संदेश.- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेत वाढ

जागतिक सायकल दिनानिमित्त आपल्या मित्र-परिवारास सायकलचं महत्त्व आणि आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी तसेच त्यांना जागतिक सायकल दिनाच्या Images, Wishes, Messages शेअर करून खास शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि समाजात जाती-धर्माची तेढ निर्माण करण्यासाटी ‘लव जिहाद’ च्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरु  राष्ट्रवादी पार्टीचे विरोधी पक्ष नेते अजित पवार .

vishwatmaklokswamivarta