
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत संजय राऊत यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले…
मुंबई प्रतिनिधी
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी मुंबई मधील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ निवासस्थानी आज सकाळी ईडी चे 10 अधिकारी पोहचले आहेत. त्यांची पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यांच्या कुटुंबियांची घरी चौकशी सुरू आहे. मात्र दुसरीकडे राऊतांनी ट्वीटर वरून प्रतिक्रिया देताना ‘खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. असे म्हटलं आहे. सोबतच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत त्यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत.
ट्विटरवर अशी माहिती
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.



