vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्वातंत्र्य दिनापूर्वी शूरवीरांना सलाम, 347 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, जम्मू-काश्मीर आघाडीवर

स्वातंत्र्य दिनापूर्वी शूरवीरांना सलाम, 347 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, जम्मू-काश्मीर आघाडीवर…

काश्मीर प्रतिनिधी

-काश्मीर आघाडीवर

आज डीजीपी दिलबाग सिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्व जवानांना पदके देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 108 पदके जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली आहेत.

 

स्वातंत्र्य दिनापूर्वी (Indepandance Day) म्हणजेच आज 347 पोलिसांना शौर्यसाठी पोलीस पदक (PMG) प्रदान करण्यात आले आहे. आज डीजीपी दिलबाग सिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्व जवानांना पदके देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 108 पदके जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र 42 पदकांसह तर छत्तीसगड 15 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राज्य दलातील एकूण 1,082 पोलीस कर्मचार्‍यांना शौर्यसह सेवा पदकांच्या विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. या संदर्भात रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, शौर्यसाठी 347 पोलीस पदके, विशिष्ट सेवेसाठी 87 राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी 648 पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

 

केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, शौर्यासाठी 347 पदकांपैकी 204 जवानांना जम्मू-काश्मीरमधील शौर्यपदक, 80 पोलिसांना वामपंथी अतिरेकी किंवा नक्षल हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणी शौर्य दाखविल्याबद्दल आणि 14 पोलिसांना ईशान्य प्रदेशात शौर्य दाखवल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.

यावेळी सर्वाधिक 109 शौर्य पदके केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) मिळाली. यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांना 108, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) 19 आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांना प्रत्येकी सहा पदके मिळाली. राज्याच्या पोलीस दलांपैकी महाराष्ट्राला 42 शौर्य पदके प्रदान करण्यात आली.

 

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

शिवभोजन थाळीला लागणार ब्रेक; शिंदे – फडणवीस सरकार योजना बंद करण्याची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणावर राज्य सरकारचा भर–महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,माणगाव येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ संपन्न

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta