vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिका कडून 162 कृत्रिम तलावं, 73 नैसर्गिक विसर्जन स्थळं गणेश विसर्जनासाठी सज्ज…

मुंबई महानगरपालिका कडून 162 कृत्रिम तलावं, 73 नैसर्गिक विसर्जन स्थळं गणेश विसर्जनासाठी सज्ज…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई महानगर पालिकेच्या माहितीनुसार, 162 कृत्रिम तलावं आणि 73 नैसर्गिक विसर्जन स्थळं तयार ठेवण्यात आली आहेत

 

31 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या गणेशोत्सवामध्ये दीड, पाच, सात,सहा आणि दहा दिवसांनी घरोघरी स्थापन झालेल्या गणपतीचं विसर्जन सुरू झाले आहे. या गणेश विसर्जनाची तयारी बीएमसी कडूनही करण्यात आली आहे. यंदा 2 वर्षांनी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणामध्ये केले जात असल्याने विसर्जनाची मिरवणूक आणि सार्वजनिक विसर्जन ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं विसर्जन आर्टिफिशिअल तलावांमध्ये करण्याचं आवाहन केले आहे. त्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती पालिकेनेही केली आहे

 

मुंबई महानगर पालिकेच्या माहितीनुसार, 162 कृत्रिम तलावं आणि 73 नैसर्गिक विसर्जन स्थळं तयार ठेवण्यात आली आहेत.ANI सोबत बोलताना Assistant Municipal Commissioner Ramakant Biradar यांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन स्थळी लाईफगार्ड्स देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. सारी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशी म्हणजे 9 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मुंबई मध्ये काल दीड दिवसांच्या गणेश विसर्जन मध्ये 22,687 मूर्त्यांचं विसर्जन झाले आहे. हे कृत्रिम तलावांमध्ये झालेले विसर्जन आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

बाल धोरण व कृती आराखड्यासंदर्भात ३० जून पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी; धैर्या बनली साताऱ्याच्या अभिमान!

आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन

छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी…