
खरेदीकरांसाठी उत्तम काळ! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या नवे दर…
व्यावसायिक प्रतिनिधी
Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. मात्र आज सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. बुधवारी सोन्याचे दर घसरले होते तर चांदीच्या दरात वाढ दिसून येत होती.आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,400 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,620 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 564 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.चेन्नई – 51,280 रुपयेदिल्ली – 50,780 रुपयेहैदराबाद – 50,620 रुपयेकोलकत्ता – 50,620 रुपयेलखनऊ – 50,780 रुपयेमुंबई – 50,620 रुपयेनागपूर – 50,650 रुपयेपूणे – 50,650 रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावीसोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.



