vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार?; अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार?; अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा

मुंबई प्रतिनिधी

– भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते परंतु शाह यांच्याशी भेट झाली नाही मात्र फोनवरून दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

 

याबाबत भाजपा खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि मी अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलो होतो परंतु शाह त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेटू शकले नाहीत. मात्र फोनवरून चर्चा झाली आहे. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही. ज्यांना राजकारण करायचं असेल ते करणारच आहेत. मात्र नाथाभाऊ भाजपात येणार आहेत असं मला माहिती नाही. मी भाजपात आहे आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत असं त्यांनी

 

भाजपा प्रवेशाचं एकनाथ खडसेंकडून खंडनपंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये हे नियम आहेत का? मोदी-शाह यांच्यासोबत विरोधक गोधडीत असल्यापासून माझे संबंध आहेत. मी अमित शाह यांना याआधीही भेटलो. यापुढेही भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असं सांगत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेचं खंडन केले आहे. 

 

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १ वर्षापूर्वी खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. विरोधी पक्षनेतेपदापासून महसूल मंत्री असा त्यांना प्रवास आहे. मुख्यमंत्रिपदापासाठी एकनाथ खडसेंचे नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना संधी दिली. त्यानंतर हळूहळू एकनाथ खडसेंचे वर्चस्व पक्षात कमी होऊ लागलं. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे खडसेंनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.  

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगर तर्फे गणेश मंडळाचे स्वागतआपल्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य गणेश मंडळे करत आहेत, त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव आहे,” – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

आज महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार उभाठा नेते संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली

vishwatmaklokswamivarta

850 कोटींचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे तरी काय? भुजबळांनी 13.5 कोटींची लाज घेतल्याचाआरोप  ईडीची याचिका मागे …

vishwatmaklokswamivarta

मराठ्यांना मागच्या दारातून आरक्षण घेऊ देणार नाही,,शिंदे समितीच्या कामकाजावर भुजबळांचा आक्षेप..

vishwatmaklokswamivarta

भाजप साठी जालना विधानसभेची जागा मिळणेसाठी प्रयत्न करणार जालना विधानसभा भाजपा बहुमताने जिंकणार-माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री भाजपाचा होणार परंतु ते कोण अजूनही गुलदस्त्यात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का? राजकीय वर्तुळात चर्चा…

vishwatmaklokswamivarta