vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

आठवड्याच्या पहिली दिवशी शेअर बाजार गडगडला त्यानंतर आज शेअर बाजारात व्यवहाराची सुरुवात

आठवड्याच्या पहिली दिवशी शेअर बाजार गडगडला त्यानंतर आज शेअर बाजारात व्यवहाराची सुरुवात Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, बाजार अस्थिर राहण्याचे संकेत…

 

व्यावसायिक प्रतिनिधी

आठवड्याच्या पहिली दिवशी शेअर बाजार गडगडला त्यानंतर आज शेअर बाजारात व्यवहाराची सुरुवात सावध झाली. पहिल्या सत्रात शेअर बाजारात सुरुवातीला किंचित तेजी दिसून आली. त्यानंतर बाजारात घसरण सुरू झाली. आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली. सुरवातीला सेन्सेक्स 133 अंकांच्या घसरणीसह 57,824.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 39 अंकांच्या घसरणीसह 17,200.05 अंकावर व्यवहार करत होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?जागतिक बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत नसल्यामुळे आणि सेंट्रल बँकांच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. येत्या काळातही बाजार सावध राहील आणि बुधवारच्या एफओएमसीवर सर्वांचे लक्ष असेल.निफ्टीला 17050 च्या जवळ सपोर्ट आहे आणि इथून त्याने चांगली वाढ केली आहे. निफ्टीने डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे. त्याच बरोबर, त्याने रिव्हर्सल फॉर्मेशन तयार केले आहे. निफ्टी 17150 च्या वर राहण्यात यशस्वी झाला तर आपण पुन्हा एकदा 17400-17450 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17150 च्या खाली घसरला तर ही घसरण 17050-17000 पर्यंत जाऊ शकते

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?टाटा मोटर्स (TATAMOTORS)टाटा कंझ्युमर्स (TATACONSUME)हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCORP)एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)आयटीसी (ITC)अशोक लेलँड (ASHOKLEY)ऍस्ट्रल (ASTRAL)पेज इंडिया (PAGEINDIA)डिक्सन (DIXON)श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRITRANSFIN)

संबंधित पोस्ट

एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) उत्पादित करण्यास इच्छुक व्यावसायिकांनी संगणक प्रणालीवर महाई-सेवा केंद्र किंवा वैयक्तीकरीत्या अर्ज करावेत..

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना;16 ऑक्टोंबरपर्यंत योजनांच्या लाभासाठी अर्ज मागविले

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) पोर्टल प्रशिक्षणाचे दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजन…

डाक विभागाची सांगलीत 25 मार्चला पेंशन अदालत