vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा घेतलेला निर्णय नैतिकदृष्ट्या आदर्श आणि ऐतिहासिक ठरणारा  स्वागतार्ह निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा घेतलेला निर्णय नैतिकदृष्ट्या आदर्श आणि ऐतिहासिक ठरणारा  स्वागतार्ह निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवल

मुंबई प्रतिनिधी –  आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या  पोटनिवडणुकीत  दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीचा ऋतुजा  लटके यांचा  विजय सुकर करण्यासाठी भाजपने  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा मान वाढविणारा; नैतिकदृष्ट्या आदर्श ऐतिहासिक स्वागतार्ह निर्णय आहे आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप चे सर्व प्रमुख नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

 

या निर्णयाला बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय ने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या नैतिक निर्णयबद्दल  ना.रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे.विजयी ठरणाऱ्या उमेदवार ऋतुजा लटके यांचे ही मा.रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराने अकाली  निधन झाले होते.त्यांच्या पत्नी   ही पोटनिवडणूक लढत आहेत.एखाद्या आमदारांचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढत असेल तर सहानुभूती आणि नैतिकदृष्ट्या विचार करून निवडणूक बिनविरोध करण्याचा आदर्श निर्णय घेणे योग्य आहे.ही परंपरा महाराष्ट्रात पाळली जावी  हीच अपेक्षा न.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

 

अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजप ;बाळासाहेबांची शीवसेना आणि आरपीआय आठवले यांची निवडणूक जिंकण्याची तयारी झाली असताना नैतिकदृष्ट्या योग्य निंर्णय घेऊन भाजप उमेदवाराने निवडणुकीतुन माचार घेणे हा स्वागतार्ह निर्णय आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

संबंधित पोस्ट

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग

नवदुर्गा माता देवी मुर्ती ‍विसर्जनासाठीशनिवारी शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल..

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

सत्कार नामांतरलढ्यातील विराचा….**रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज  सत्कार समारंभ* 

मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला असल्यानेदि 02 ऑगस्ट ते दि 05 ऑगस्ट 2024 पर्यंत रस्ता बंद करण्याचा मनाई आदेश जारी