vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

हदयविकार सर्वाधिक घातक

हदयविकार सर्वाधिक घातक

 

आरोग्य प्रतिनिधी

जीवन-मृत्यू कधी माणसाच्या हातात नसतोच, एकदा नियतीने डाव साधला की क्षणार्धात होत्याचं नव्हतं होते. त्यामुळे येथे क्षणाचाही भरोसा नाही. गत एक वर्षात बुलडाणा जिल्ह्यामध्ये रस्ते अपघातांसह विविध कारणामुळे ६२८३ लोकांना आपला जीव गमावला लागला. ही आकडेवारी खरंच धक्कादायक आहे.गत दोन महिन्यापासून जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढली आहे. भरधाव वाहन, मार्गावरील खड्डे आणि बेशिस्त वाहतूक यामुळे झालेल्या अपघात १२ जणांना आपल्या प्राणांना मुलाकवे लागले तर ३० जखमी झाले. यात आत्महत्या, विद्युत धक्का, जाळणे व इतर कारणांमुळे मृत्यूमुखी पडणार्‍याची संख्या मोठी आहे. शिवाय शारिरीक आजारांमुळेही अनेकांवर आकस्तिक मृत्यू ओढावला.

 

जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय; सामान्य रुग्णालय बुलडाणा यांनी राज्य सांख्यिकी विभागाकडे सादर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.बदललेली जिवनशैलीमुळे वाढणारे आजार, ताणतणाव खराब झालेली मानसिकतेतून वाढत्या आत्महत्या शिवाय परिसर अस्वच्छतेमुळे उद्धवणारे आजारही किती जिवघेणे ठरु शकतात याचे चित्र जिल्ह्यात विदारक झाले आहे. यामुळे गत वर्षभरात जिल्ह्यात ३६४८ पुरुष आणि २४९१ महिलांना आपला जीव गमवावा लागला.

 

साथरोगाने २५२ मृत्यूहिवतापमुळे १, विषमज्वरचा १, क्षयरोगाने ७६, श्‍वसनक्रियेसंबधी आजाराने १७३ शिवाय गॅस्ट्रोमुळे १ असे एकूण २५२ लोकांवर साथरोग आजारमुळे मृत्यु ओढावला.हदयविकार सर्वाधिक घातकवाढलेल्या मानसिक त्रास व बदलेली जिवनशैली यामुळे हदयचे विकास वाढल आहे. हदय विकाराच्या धक्क्याने एक वर्षात ८८४ लोकांनी जगाचा निरोप घेतला. तर कर्करोगमुळे ३२१, पक्षाघात कारणामुळे १३६ शिवाय एडस ४ आणि मुत्रपिंड विकारामुळे २४४ जणांचा मृत्यू झाला. तर बाळंतपणात १० मातामृत्यूची नोंद आहे.बेशिस्त वाहतुकीचे सर्वाधिक बळीअपघात प्राणज्योत मावळली की, संसाराची राखरांगोळी होवून कुटूंब उघड्यावर येते. गतवर्षभरात ६१० लोकांनी रस्ते आणि इतर आकस्मिक अपघातात आले प्राण जमावले. यात आत्महत्या ३०३, रस्ते वाहतूक १४६, विद्युत धक्का ४२, जळल्यामुळे १४ आणि इतर अपघातात १०५ लोकांवर मृत्यू ओढावला. शिवाय ३८१२ जणांचा इतर विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याचे अहवालात नमुद केले आहे.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात कर्करोग निदानासाठी फिरती कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

आयोडीनयुक्त मीठ, सैंधव/काळे मीठ*प्रथम आपण ह्या विविध मीठांचे गुण पाहू.

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 34 हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी**नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींकरीता आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन सत्रे*

vishwatmaklokswamivarta

हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील , पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते

प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई येथे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचा आढावा व “निक्षय पोषण किट” वितरणाचा तालुका स्तरीय शुभारंभ..