
गुजरातमधील मोरबीमध्ये पूल कोसळल्याने 132 जणांचा मृत्यू, जाणून घ्या आतापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम.
गुजरात प्रतिनिधी
अपघाताच्या वेळी पुलावर 300 हून अधिक लोक उपस्थित होते. 233 मीटर लांबीचा हा पूल सुमारे शंभर वर्षे जुना होता. या अपघातात 132 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातमधील मोरबी (Morbi) जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता मच्छू नदीवरील केबल पूल (Cable Bridge) कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर 300 हून अधिक लोक उपस्थित होते. 233 मीटर लांबीचा हा पूल सुमारे शंभर वर्षे जुना होता. या अपघातात 132 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, राज्य सरकारचे मंत्री ब्रजेश मेरजा यांनी 60 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. ज्यात बहुतेक महिला आणि मुले आहेत. सुमारे 50 लोक बेपत्ता असून सुमारे 170 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींचे जबाबही समोर आले आहेत.
राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोमवारी सकाळी सांगितले की, या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आयजीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.
सर्वजण रात्रभर मदतकार्यात गुंतल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर नौदल, एनडीआरएफ, हवाई दल आणि लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. रात्रभर 200 हून अधिक जवान शोध आणि मदतकार्यात गुंतले होते. खुद्द गृहमंत्री अमित शाह मोरबी दुर्घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रात्रभर ते पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात होते. गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीही संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घटनेची सर्व माहिती देण्यात आली.
गुजरातच्या सीओओने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या 50 जवानांसह एनडीआरएफची 3 पथके, भारतीय वायुसेनेच्या 30 जवानांसह बचाव आणि मदत कार्यासाठी लष्कराच्या 2 तुकड्या आणि राजकोट, जामनगर, दीव आणि सुरेंद्रनगर येथून अत्याधुनिक उपकरणांसह अग्निशमन दलाची 7 पथके घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. या पथकांनी लोकांनी अनेकांची सुटकाही केली आहे.



