vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देणार राजीनामा..

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देणार राजीनामा..

 

ठाणे प्रतिनिधी:

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, आपल्याविरोधात 72 तासांत दोन खोटे गुन्हे (Crime News) दाखल केल्याने आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

ठाण्यातील वर्तक पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. आता मुंब्रा येथे त्यांच्याविरोधात महिलेच्या आरोपानंतर विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. आपल्याविरोधात 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याने आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करताना म्हटले आहे. आपण पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे.

 

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप  आव्हाड यांच्यावर केला आहे. त्यामुळे आव्हाड हे वादात सापडले आहेत. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आव्हाड हे व्यथित झाले आहेत. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे, आपल्याविरोधात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड कमालीचे संतापलेत. या पोलिसी अत्याचाराविरोधात आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलंय. 72 तासांत आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार असल्याचं आव्हाड म्हणाले. मी पोलिसांच्या अत्याचाराविरोधात लढणार आहे. त्यामुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे त्यांनी ट्विटमधून सूचीत केले आहे.

संबंधित पोस्ट

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचाकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा..

जालना येथे धनगर समाजाचा भव्य आरक्षण मोर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta

ब्राह्मोस क्षेपणास्त्र करारावर भारत -फिलीपीन्सची आज होणार स्वाक्षरी;

vishwatmaklokswamivarta

विकास कामांना प्राधान्य देऊन कामे गतीने पूर्ण करा ,पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदानलोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४…