
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज 23 बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादव यांची घेणार भेट…
मुंबई प्रतिनिधी
बिहार दौऱ्यात आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरेंसह महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे बुधवारी एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पाटण्याला जाणार आहेत. बिहार दौऱ्यात आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरेंसह महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांमध्ये खासदार अनिल देसाई आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश असेल. आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याची माहिती शिवसेना गटाचे सचिव सूरज चव्हाण यांनी प्रसिद्ध केली आहे. आदित्य यांच्या बिहार दौऱ्याकडे तेजस्वी यादव यांच्याकडून सदिच्छा म्हणून पाहिले जात आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत संजय राऊत सहभागी होऊ शकतात.
यापूर्वी आदित्य ठाकरेही राहुल यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सामील झाले आहेत. अशा परिस्थितीत आता आदित्य ठाकरेंच्या बिहार दौर्यावरून विविध शक्ती भाजपविरोधात संवाद वाढवत असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या सरकारच्या विरोधात सर्व शक्ती एकवटत असतील तर त्यात गैर काय, असा टोलाही संजय राऊत यांनी मंगळवारी लगावला. लोकशाहीत असे घडते, ही एक सामान्य घटना आहे.



