vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत    –खासदार सुनिल तटकरे

जिल्ह्यातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत    –खासदार सुनिल तटकरे

रायगड- प्रतिनिधी :- जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरु असून सुरु असलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत,असे निर्देश खासदार सुनिल तटकरे यांनी जिल्हा नियोजन भवन हॉल येथे आयोजित विविध विषयांच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी सत्यजित बडे आदि उपस्थित होते.

खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, वडखळ-अलिबाग रस्त्याचे काम, बेलकडे मार्गे अलिबाग-रोहा रस्त्याची प्रलंबित असलेली कामे तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. त्याचप्रमाणे राजेवाडी ते म्हाप्रळ या नॅशनल हायवेच्या कामामध्ये काही अडी-अडचणी असतील तर त्या सोडवून ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे. मुंबई-गोवा हायवेवरील इंदापूर व माणगाव येथील बायपासची कामेपण सुरु करावीत. नातेखिंड ते रायगड हा रस्ता जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर असून तेथील कामे प्रलंबित असतील तर ती कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. मुरुड तालुक्यात मोठ्याप्रमाणावर पर्यटक येत असतात त्यामुळे साळाव ते मुरुड रस्ता तसेच रोहा ते आगरदांडा रस्त्याची कामे पूर्ण करावीत. तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे कृषी अधिकारी व तलाठी यांनी संयुक्त पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. सर्पदंश लस, डायलेलीसच्या सुविधाही उपलब्ध ठेवाव्यात.

००००००००

संबंधित पोस्ट

अन्न, नागरी पुरवठा विभाग-राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर

निवडणुक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रारुप प्रभागरचना आज सोमवारी प्रसिद्ध*  *हरकती अथवा सूचना २१ जुलै पर्यंत सादर कराव्यात*

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार- दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे