vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय. माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट करून माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय. माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट करून माहिती दिली आहे.

राजकीय प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, कारण शरद पवारांच्या सगळ्यात जवळच्या सहकाऱ्यानेच त्यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट करून माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणासाठी आपण पक्ष सोडत असल्याचं माजिद मेमन म्हणाले आहेत.

’16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला शरद पवारांकडून मार्गदर्शन आणि सन्मान मिळाला, याबद्दल मी कृतज्ञ आहे. वैयक्तिक कारणासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यत्व तत्काळ सोडत आहे. पवार साहेब आणि पक्षासोबत माझ्या शुभेच्छा आहेत,’ असं ट्वीट माजिद मेमन यांनी केलं आहे.

माजिद मेमन हे 2014 ते 2020 या काळात राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार होते. तसंच ते कायदा आणि न्याय समितीचे सदस्यही होते. पेशाने वकील असलेल्या माजिद मेमन यांनी राष्ट्रीय न्यूज चॅनल्सवर राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू अनेकवेळा मांडली होती.

 

Majeed Memon
@advmajeedmemon

Follow

My gratitude to NCP Chief Hon’ble Sharad Pawarji for giving me honour and invaluable guidance during my 16 years with NCP. For personal reasons I cease to be a member of NCP with immediate effect. My best wishes always with Pawar Saheb and the Party.
111
Reply
Share

संबंधित पोस्ट

आज विधिमंडळातील ठळक बातमी: संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पेटवलं रान! विधिमंडळात भाजप-शिंदे गट आक्रमक

भाजपाची तळी उचलून…” राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून अंबादास दानवे यांचा हल्लाबोल!शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे

नवाब मलिक यांना दिलासा कायम; वैद्यकीय कारणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला अजून 6 महिन्यांचा जामीन..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट,काँग्रेसह विरोधी पक्षांनी सरकावर टीकेची झोड..

मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवर निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक निकालांनंतर आता ‘इंडिया’ ची पुढील बैठक 6 डिसेंबरला…

vishwatmaklokswamivarta