vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अफगाणिस्तानमध्ये नमाजानंतर मदरशात झालेल्या बॉम्बस्फोटात 15 ठार, तर 27 जखमी

अफगाणिस्तानमध्ये नमाजानंतर मदरशात झालेल्या बॉम्बस्फोटात 15 ठार, तर 27 जखमी…

 

विदेश प्रतिनिधी

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या प्रार्थनेदरम्यान हा स्फोट झाला. स्फोटानंतर 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, 27 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

अफगाणिस्तान (Afghanistan) च्या समांगन प्रांतातील ऐबक शहरातील जाहदिया मदरशात बुधवारी दुपारी बॉम्बस्फोट (Blast) झाला. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले. हा स्फोट दुपारच्या प्रार्थनेनंतर झाला, असे एका आघाडीच्या अफगाण मीडिया गटाने प्रांतीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे.

तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर अफगाणिस्तानमधील एका मदरशात झालेल्या बॉम्बस्फोटात किमान दहा विद्यार्थी ठार झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या स्फोटाबाबत सुरक्षा अधिकार्‍यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. स्फोटानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या प्रार्थनेदरम्यान हा स्फोट झाला. स्फोटानंतर 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, 27 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर ठार झालेल्या एकूण लोकांमध्ये सुमारे 10 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे

दरम्यान, 15 ऑगस्ट 2021 पासून अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबान सातत्याने देशात शांतता प्रस्थापित करण्याचा दावा करत आहे, परंतु हल्ल्यांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये मोर्टार शेलचा स्फोट झाला होता. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत निवेदनानुसार हा स्फोट दहशतवादी हल्ला नव्हता.

संबंधित पोस्ट

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटर हटवला; हल्लेखोर हा दी मतार ला पश्चाताप नाही

इस्लामिक स्टेटने स्वीकारली मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी; आतापर्तंत 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी

महिलांच्या हक्कांचे समर्थन केल्याबद्दल इराणमध्ये फाशीची शिक्षा…

vishwatmaklokswamivarta

रशियाने डागली 75 क्षेपणास्त्र, विविध शहरांमध्ये असंख्य नागरिक ठार झाल्याचा युक्रेनचा दावा

vishwatmaklokswamivarta

धक्कादायक! ट्रकमध्ये सापडले तब्बल 42 जणांचे मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिक भूमी…

vishwatmaklokswamivarta