
ठाणे येथे एसटी बसला अचानक आग, 65 प्रवासी थोडक्यात बचावले…
ठाणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेतला तेव्हा बसमध्ये 65 प्रवासी होते. ठाणे (Thane) शहर हद्दीत असलेल्या हद्दीतील उतळेश्वर (Utaleshwar) येथे ही घटना आज (3 जानेवारी) सकाळी 8 वाजणेच्या सुमारास घडली. दरम्यान, बसला लागलेली आग (MSRTC Bus Catches Fire in Thane) तातडीने आटोक्यात आणण्यात आणल्याने संभाव्य दुर्घटना टळली
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेतला तेव्हा बसमध्ये 65 प्रवासी होते. ठाणे (Thane ) शहर हद्दीत असलेल्या हद्दीतील उतळेश्वर (Utaleshwar) येथे ही घटना आज (3 जानेवारी) सकाळी 8 वाजणेच्या सुमारास घडली. दरम्यान, बसला लागलेली आग (MSRTC Bus Catches Fire in Thane) तातडीने आटोक्यात आणण्यात आणल्याने संभाव्य दुर्घटना टळली. दरम्यान, प्रवाशांना तातडीने बसमधून उतरविण्यात आले. प्रवासी सुखरुप असले तरी ते बराच वेळ घाबरलेल्या अवस्थेत होते
लेटेस्टली मराठीच्या इंग्रजी भाषेतील सरकारी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख अविनाश सावंत यांनी संगितले की, ठाणे शहराच्या हद्दीतील उतळेश्वरजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सदर बस, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची असून, त्यातून साधारण 65 प्रवासी प्रवास करत होते. ही बस ठाण्याहून शेजारच्या भिवंडी शहराकडे जात होती.



