vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार..

 

मुंबई प्रतिनिधी निवडणूक आयोगाने शिवसेना  पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या आदेशाने उद्धव ठाकरे गटाला  मोठा झटका बसला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाची तातडीची बैठक बोलावली आहे

 बैठकीत सर्व आमदार, खासदार आणि नेते सहभागी होणार आहेत. दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर या बैठकीत पुढील भूमिका काय असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी परिसरातील आमदार, खासदार तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. 21 फेब्रुवारीपासून सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे

न्यायालयाच्या निर्णयापूर्वी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. न्यायालयाच्या निर्णयापूर्वी निवडणूक आयोगाला निर्णय देण्याची घाई का झाली, असा सवाल त्यांनी केला. या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. न्यायव्यवस्था कशी दबावाखाली येईल याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पण हा निर्णय अतिशय अनपेक्षित आहे, कारण जवळपास सहा महिने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आता त्याची सलग सुनावणी सुरू होणार आहे. निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी आम्ही केली होती.  कालचा निकाल लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

 

संबंधित पोस्ट

न्यूड व्हिडिओ शूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने राज कुंद्राबद्दल केला धक्कादायक खुलासा.

vishwatmaklokswamivarta

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद,आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार..

vishwatmaklokswamivarta

तुर्की  आणि सीरियामध्ये  आलेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भीषण भूकंपामुळे जगभरामध्ये खळबळ उडाली: भारताने पुढे केला मदतीचा हात! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्ह्यात एकाच वाघाने दहापेक्षा अधिक जीव घेतल्याच्या घटनेने खळबळ,महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू

vishwatmaklokswamivarta

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडकअंमलबजावणीसाठीसोनोग्राफी, एमटीपी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतींयाना 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta