vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची असले. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी

शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची असले. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी…

नवी दिल्ली प्रतिनिधी

शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची असले. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गंटाला दिली आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. याशिवाय एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे

सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. २१ जूनपासून ज्या घटना घडत आहेत. त्या घटनांचा क्रम सर्वोच्च न्यायालयाने तपासावा. यावर कशाप्रकारे कारवाई होऊ शकते, याकडे विशेष लक्ष द्यावे. राज्यपालांचे अधिकार देखील सर्वोच्च न्यायालयाने तपासावे. तसेच सरकार कसे स्थापन झाले, याची चौकशी न्यायालयाने करावी, असे अनिल देसाई म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनिल देसाई म्हणाले, आयोगाचा निकाल धक्कादायक होता. सुनावणी सुरू असताना आयोगाने निकाल द्यायला नको होता. या निकालाचा सत्तासंघर्षावर विपरीत परिणाम होऊ शकतो

काल उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगाव प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने अलोकतांत्रिक निर्णय घेत आहे, त्यावरून प्रश्न निर्माण होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच निवडणूक आयोग बरखास्त करा. न्यायाधीशांप्रमाणे निवडणूक आयुक्तांचीही नियुक्ती झाली पाहिजे, तोपर्यंत आयोगाचे काम सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

संबंधित पोस्ट

मुंबईच्या बीकेसी वर पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळावा 2022च्या निधीचा स्रोत शोधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

vishwatmaklokswamivarta

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावू – आ. राजेश टोपे एसटी कामगारांचे धरणे आंदोलन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta

मुसळधार! मुंबई परिसरासह, कोकणातही धो-धो पाऊस, पुढील 3 ते 4 तास आणखी कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

राज्याचे रत्ने व आभूषणे धोरण – २०२५ जाहीर राज्याच्या गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रासाठी झळाळी,एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्द‍िष्ट..