vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजपच्या विजयासाठी मनसे शेवटच्या क्षणी मैदानात; राज ठाकरें

भाजपच्या विजयासाठी मनसे शेवटच्या क्षणी मैदानात; राज ठाकरें महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष

 

मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्राच्या या

राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. अशातच कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत पूर्ण क्षमतेने लढण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अशातच मनसे नेते बाळा नांदगावकर गेल्या दोन दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तळ ठोकून आहेत. आता मतदान होईपर्यंत ते पुण्यातच असणार आहेत. कसबा आणि चिंचवड येथील निवडणुका होईपर्यंत ते पुण्यातच असणार आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या मतदानासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर काम करण्याचे आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार पक्षाचा प्रत्येक मनसेसैनिक भाजपाचे उमेदवार रासने यांच्यासाठी काम करणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले आहे.
संध्याकाळी प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा या संदर्भातील आदेश सर्व मनसैनिकांना देण्यात आले आहेत. सुरवातीपासून मनसे या निवडणुकीपासून दोन हात लांब राहीली होती. या निवडणुकीत मनसे थेट निवडणुकीच्या प्रचारात उतरणार नव्हती. त्यांनी केवळ भाजपला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं होतं.काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रचारामध्ये मनसे कुठेही सक्रिय दिसली नाही. मात्र, आता निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच मनसेच्यावतीने भाजपासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

सर्वसमावेशक सल्लागार समिती बैठक महिलांचे हक्क संरक्षण व आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

vishwatmaklokswamivarta

अँजिओग्राफी करुन मला मारुन टाकण्याचा कट होता; भाजपा नेते आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप…

महाराष्ट्रात खळबळ जनक दर्शना पवार हत्याकांड आधी कंपासमधीस कटरनं हत्या आरोपीचा कबूलनामा …

vishwatmaklokswamivarta

राज्यातील कारागृहातील बंद्यांकरिता ई-मुलाखत सुविधा; नातेवाईक, वकीलांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचा आवाहन…

विधानपरिषद प्रश्नोत्तर :ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम