vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील कारागृहातील बंद्यांकरिता ई-मुलाखत सुविधा; नातेवाईक, वकीलांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचा आवाहन…

राज्यातील कारागृहातील बंद्यांकरिता ई-मुलाखत सुविधा; नातेवाईक, वकीलांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचा आवाहन…

 

राज्य प्रतिनिधी –

बुलडाणा,: बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याचा बाहेरील जगाशी व नातेवाईक यांचेशी संपर्क तुटून जातो. बंद्यांच्या नातेवाईकासोबत संपर्क साधता यावा, यासाठी बुलढाणा कारागृहामार्फत नातेवाईक व वकील यांना व्हर्चुअल पद्धतीने घरुनच मोबाईलचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. या ई-मुलाखत सुविधेचा लाभ बुलढाणा जिल्हा कारागृहात बंदीस्त असलेल्या बंद्यांच्या नातेवाईकांनी तसेच वकीलांनी घ्यावा, असे आवाहन बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केलेले आहे.

कारागृहात दाखल झालेल्या बंद्यासाठी त्यांच्या नातेवाइकांसोबत संपर्क साधण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे मुलाखत सुविधा. यामध्ये बंद्याचे नातेवाईक व वकील यांना कारागृहात प्रत्यक्ष मुलाखत घेता येते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कारागृह विभागानेसुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन कारागृहात बंद्याचे नातेवाईक व वकील यांना व्हर्चुअल पद्धतीने घरुनच मोबाईलचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांना त्यांचे नातेवाईक व वकील यांचेकरीता भेटीसाठी कारागृहात दोन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग संच उपलब्ध असून आवश्यकतेनुसार व्हीसी संचांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

यापुर्वी बंद्यांचे कारागृहातील प्रत्यक्ष मुलाखतीकरीता चार खिडक्या उपलब्ध होत्या. आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नव्याने मुलाखत कक्ष बांधण्यात आलेला असून यात 10 खिडक्यांद्वारे बंदी त्यांचे नातेवाईक व वकील यांचेशी प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. तसेच कारागृह प्रशासनाकडून बंद्यासाठी दूरध्वनी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आले असून बंद्यांच्या नातेवाईकांचे व्हेरीफाईड मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. कारागृहात असलेले विदेशी बंदी, कारागृहातील भारतीय बंदी ज्यांचे नातेवाईक विदेशात राहतात त्यांच्यासह सर्व बंद्यांना या सुविधेचा लाभ मिळतो. सद्यस्थितीत पाकीस्तानी बंद्यांना हि सुविधा लागू नाही.

नातेवाईक व वकील हे NPIP (www.eprisons.nic.in/npip) या पोर्टलवरुन स्वतःची व बंद्याची माहिती नमुद करुन कारागृहाला व्हीसी भेटीसाठी ऑनलाईन विनंती करु शकतात. पात्र नातेवाईक व वकील यांना कारागृहाकडून व्हीसी मुलाखतीला मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नमुद ई-मेलवर व्हीसी भेटीची वेळ व दिनांक निश्चीत केल्यानंतर बंद्याला कारागृहातून व्हीसीद्वारे उपस्थित ठेऊन बंदी व त्याचे नातेवाईक, वकील यांच्याशी ई-मुलाखत केली जाते.

व्हीसी मुलाखतीमुळे बंद्याचे नातेवाईक व वकील यांचे वेळ, श्रम व पैशाची बचत होणार आहे. आजारी व वयस्कर नातेवाईक तसेच लहान मुले यांना प्रत्यक्ष मुलाखतीस येण्याची दगदग न होता घरबसल्या मुलाखत घेणे शक्य होईल. जिल्हा, परराज्यातील किंवा विदेशातील नातेवाईक यांना घरुन मुलाखत घेता येत असल्यामुळे त्यांचा होणारा त्रास कमी होणार आहे. तसेच प्रत्यक्ष कारागृहात मुलाखतीकरीता येणारे नातेवाईक व वकील यांची संख्या कमी होऊन प्रशासनाला मदत होणार आहे. ई-मुलाखत सुविधेचा जास्तीत जास्त वापर व्हावा या करीता कारागृह प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी कारागृह परीसरात व मुलाखत नावनोंदणी कक्षाजवळ माहितीफलक लावण्यात आले आहेत. कारागृह अधीक्षकांच्या साप्ताहीक संचार फेरीदरम्यान सुद्धा बंद्यांना सदर सुविधेची माहिती देऊन नातेवाईक व वकीलांसोबत संवाद साधण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. 000000

संबंधित पोस्ट

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

अनुसुचित  जातीच्या निवासी आश्रम शाळेच्या वतीने मेळावा व सामाजिक न्याय मंत्र्याचा सत्कार सोहळा; सर्वांनी उपस्थित राहण्याचे अ‍ॅड. चव्हाण यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन” 

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये गडचिरोलीच्या काटेझरी गावातील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख: माओवादग्रस्त भागात विकासाची बस पोहोचली*

जालना शहर महानगरपालिका मार्फत जालना शहरातील दिनांक 07 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या 290 गणेश मूर्तींचे महापालिकेमार्फत श्री छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंड येथे विसर्जन

vishwatmaklokswamivarta