
महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळ जनक बातमी : गिरीश महाजन आणि फडणवीसला अटक करण्याची चर्चा माझ्यासमोर; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट…
मंत्रालय प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला अटक करण्याची चर्चा माझ्यासमोर झाली या सर्वांचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो हे आज सांगणार नाही,
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला अटक करण्याची चर्चा माझ्यासमोर झाली या सर्वांचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. दाऊदची बहीण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा तत्काळीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला नाही बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लावला.



