
लैंगिक उद्देशाशिवाय अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर हात फिरवणे म्हणजे विनयभंग नव्हे- मुंबई उच्च न्यायालय
मुंबई प्रतिनिधी
कोणताही लैंगिक उद्देश नसताना एखाद्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या पाठ अथवा डोक्यावरुन हात फिरवला तर त्याला विनयभंग अथवा मुलीच्या विनयशीलतेला धक्का मानता येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे.
कोणताही लैंगिक उद्देश नसताना एखाद्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या पाठ अथवा डोक्यावरुन हात फिरवला तर त्याला विनयभंग अथवा मुलीच्या विनयशीलतेला धक्का मानता येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. या टिप्पणीसोबतच न्यायालयाने 28 वर्षीय तरुणाची शिक्षाही रद्द केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सन 2012 मधील हे सुमारे 10 वर्षांपूर्वीचे प्रकरण सुनावणीला आले होते. तत्कालीन 18 वर्षीय एका तरुणाने 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा गु्हा दाखल करण्यात आला होता. तरुणावर आरोप होता की, त्याने पीडितेच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवला आणि आता ती खूपच मोठी झाल्याची टीप्पणी केली होती.
न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने आरोपीवरील दोषारोप बाजूला ठेवताना नमूद केले की, कृत्य करताना आरोपीचा कोणताही लैंगिक हेतू नव्हता आणि त्याच्या बोलण्यावरून असे दिसून येते की त्याने पीडितेला लहानपणी पाहिले होते. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी पुढे म्हटले की, एखाद्या महलेल्या विनयशीलतेला धक्का पोहोचण्यासाठी आरोपीने विनयभंग करताना तसा उद्देश ठेवलेला असायला पाहिजे. आरोपीवर ठेवण्यात आलेल आरोप त्यासाठी पुरेसे नाहीत. केवळ डोक्यावरुन आणि पाठीवरुन कोणताही लैंगिक उद्देश नसताना हात फिरवणे म्हणजे विनयभंग म्हणता येणारन नाही
न्यायमूर्तींनी पुढे म्हटले की, 12 ते 13 वर्षे वयोगाटातील सदर मुलीेन आरोपी केणताही वाईट शब्द बोलल्याचे म्हटले नाही. फक्त ती त्याच्या कृत्यामुळे काहीशी अस्वस्थ झाली असे दिसते. न्यायमूर्तींनी विनयभंग झाल्याचा अथवा पीडितेच्या विनयशिलतेला धक्का पोहोचल्याचे सिद्ध करण्यास फिर्यादी अपयशी ठरल्याचेही न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, पीडिचेचा विनयभंग झाल्याची पुष्टी करणारा विशिष्ट हेतून स्पष्ट झाला नसतानाही आरोपीविरुद्ध 354 कलम लावण्यात आले, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले



