vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द: सोनिया गांधी पोहचल्या राहुल गांधींच्या भेटीला अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द: सोनिया गांधी पोहचल्या राहुल गांधींच्या भेटीला अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया…

नवी दिल्ली प्रतिनिधी

काल राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टाने निकाल देताच आज 24 तासाच्या आतच लोकसभा सचिवालयाने कारवाई केली आहे.लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8(3) नुसार संसद सदस्याला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवून त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा होते, तेव्हा तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो. अनेक राजकीय नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया..

मोदी या आडनावावरून त्यांनी केलेल्या टीपण्णीवरून सुरत कोर्टाने 2 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही लोकसभा सचिवालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.  दरम्यान यावरून देशभरातून विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. राहुल गांधी यांच्यावरील ही कारवाई म्हणजे ते राहुल गांधींना घाबरतात आणि लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे असे कॉंग्रेस कडून सांगण्यात आले 

कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपा सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणाले आहेत. याप्रकरणी JPC ची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे

 

राहुल गांधींनी अदानींवर पंतप्रधानांना प्रश्न विचारला तेव्हापासूनच त्यांनी राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा हा प्रकार सुरू केला. मोदी सरकारच्या मंत्र्यांनी राहुल गांधींवर अनेकदा चुकीचे आरोप केले. राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची आणि बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. यावरून भाजप सरकारची लोकशाहीविरोधी आणि हुकूमशाही वृत्ती स्पष्टपणे दिसून येते अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, दिल्ली यांनी दिली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाजप नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाते, तर विरोधी नेत्यांना त्यांच्या भाषणासाठी अपात्र ठरवले जाते. आज आपण आपल्या घटनात्मक लोकशाहीसाठी नवा नीचांक असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जींनी दिली आहे. 

अखिलेश यादव प्रतिक्रिया…महागाई, बेरोजगारी सारख्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी जाणूनबुजून राहुल गांधी यांच्यावर करवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी काल ज्या अर्थी 2 वर्षाची शिक्षा सुनावली तेव्हा यापुढे काही प्लॅन असेल त्याचा अंदाज आला होता. आज नेमकं तेच झालं आहे. मी या कृतीचा निषेध करतो. पण यामधून नरेंद्र मोदी राहुल गांधी यांना किती घाबरता हे यावरून दिसतं असं म्हटलं आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी  यांना सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविले असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या कारवाईनंतर राहुल गांधींची बहिण प्रियंका गांधी  यांनी देखील भाजप सरकारवर टिका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप देखीस त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहूल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू उद्धव ठाकरे असे हे संजय राऊत म्हणाले ट्विटरवर प्रतिक्रिया दिली

 

संबंधित पोस्ट

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भातअभ्यास अहवाल तयार करावा- वनमंत्री गणेश नाईक

मुंबईतील बहुचर्चित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प : पात्र रहिवाशांना मिळणार 300 चौरस फूट कार्पेट एरियासह अनेक सुविधा…

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत जास्तीत जास्त सुविधा निर्मिती करावी-क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अमरावती विभागातील १,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत…

vishwatmaklokswamivarta

निवडणूक आयोगाची नवी डिजिटल प्रणाली-इंडेक्स कार्ड व आकडेवारी अहवालांची जलद निर्मिती..

टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार

vishwatmaklokswamivarta