vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ईडी आणि सीबीआय कारवाई विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव,  5 एप्रिलला सुनावणी…

ईडी आणि सीबीआय कारवाई विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव,  5 एप्रिलला सुनावणी…

नवी दिल्ली प्रतिनिधी

ईडी  सीबीआयच्या कारवाईविरोधात काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षासह ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचा देखील एकुण 14 पक्षांनी या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जेष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे ईडी, सीबीआयच्या कारवाईविरोधात विरोधा पक्षाची बाजू ही सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहे

काँग्रेस  पक्षासह ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचा देखील एकुण 14 पक्षांनी या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जेष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे ईडी, सीबीआयच्या कारवाईविरोधात विरोधा पक्षाची बाजू ही सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहे. देशात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सीबीआय आणि ईडीकडून कारवाई करण्यात आली असून त्यांना अटक आणि चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  5 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

 

ईडी आणि सीबीआय कारवाई विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अभिषेक मनू सिंघवी यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मांडले आहे. सरन्यायाधीशांनी 5 एप्रिल रोजी सुनावणीचे आश्वासन दिले. त्यामुळे पुढील महिन्यात काय निर्णय येणार याची उत्सुकता आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि दिल्ली आदी राज्यांत ईडी आणि सीबीआयकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याबाबत विरोधकांनी आरोप करताना म्हटले आहे की, आम्हाला त्रास देण्यासाठी कारस्थान रचले जात आहे. केंद्रीय तपाय यंत्रणांचा गैरवापर आमच्याविरोधात करण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडी आणि सीबीआयकडून विरोधी नेत्यांची मनमानी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व आणि अटकेनंतर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

भारत राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, जनता दल (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष,शिवसेना (ठाकरे गट), नॅशनल कॉन्फरन्स (NC), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम या 14 पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे.

 

 

संबंधित पोस्ट

संवेदनशीलता आणि समन्वयाने हाताळा कायदा सुव्यवस्था-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष: शिवसेना 16 आमदार अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सलग चौथ्यांदा लांबणीवर…

संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही; संविधान बदलणाऱ्यांना बदलण्यासाठी मोदींसोबत मी उभा आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

रंगानुभूति’ सारख्या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडची ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून ओळख निर्माण होतेय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

परळीतील महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती

vishwatmaklokswamivarta