vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणीच होईल व राज्याच्या विकासासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणीच होईल व राज्याच्या विकासासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मंत्रालय प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणीच होईल व राज्याच्या विकासासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. कोकण रिफायनरीवरून रत्नागिरीतील वातावरण चांगलेच तापलं आहे. स्थानिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी विरोध दर्शवला

एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीसांनी रिफायनरीबाबत आपली भूमिका मांडली. रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी केली.

काय म्हणाले फडणवीस? या रिफायनरीमुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आम्हाला हा रिफायनरी प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. बारसू गावात सध्या रिफायनरीच्या ठिकाणी बोअर मारले जात आहेत. ही जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचे अहवाल आल्यानंतर रिफायनरी उभी राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून निसर्गाला कोणताही धोका पोहचणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पामुळे राज्याचा मोठा विकास होणार असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. या रिफायनरी प्रकल्पात असणाऱ्या तीन कंपन्यांनी वेगळ्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले होते. मात्र, आपण हा प्रकल्प अखंडितपणे राज्यात सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता हा प्रकल्प एकाच ठिकाणी कोकणात उभा राहत आहे. रिफायनरी विरोधात अपप्रचार सुरू आहे. त्यातून विरोध होत असल्याचे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीचे सरकार असताना रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या जागेसाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. आता, त्यांची भूमिका विरोधाची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले

 

 

संबंधित पोस्ट

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार मल्लिकार्जुन खडगे आज दुपारी 12.30 वाजता घेणार पत्रकार परिषद

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णयगोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी ४१४ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर,आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची तंत्र व शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ घेतली दखल

✨🎬 गणेशोत्सव 2025 निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा 🎬✨

मोठी बातमी! महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची आणि गोपनीयतेची शपथ..

vishwatmaklokswamivarta