vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

श्री संत गजानन महाराज हे साक्षात परब्रह्म – धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज*1111 श्री भक्‍तांचा महापारायण सोहळा, श्रीक्षेत्र शेगाव

श्री संत गजानन महाराज हे साक्षात परब्रह्म – धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज*1111 श्री भक्‍तांचा महापारायण सोहळा, श्रीक्षेत्र शेगाव

 

राज्य प्रतिनिधी

श्री संत गजानन महाराजांनी अनेक रुपात दर्शन दिले, आजही वेगवेगळ्या रुपात अनेकांना दर्शन देतात. त्‍यांचे रूप जरी वेगवेगळे असले तरी त्‍यांचे स्‍वरूप एकच आहे. ते साक्षात ब्रम्‍हस्‍वरूप आहेत, असे सांगताना धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराजांनी तुकडोजी महाराजांच्‍या ‘हर देस में तू, हर भेस में तू, तेरे नाम अनेक, तू एकही है’ या वचनाचा उल्‍लेख केला.

समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्‍या साक्षीभाव चैतन्‍याने पुनित संत श्रेष्‍ठ श्री गजानन महाराज धाम शेगाव येथे मंगळवारी श्री गुरु मंदिर, जयप्रकाशनगर धर्मभास्‍कर प. पू. सद्गुरूदास महाराजांच्‍या आशीर्वचनाचा लाभ भाविकांना झाला. श्री भक्‍त व पारायण सेवा समितीच्‍यावतीने दशमी एकादशी ते द्वादशी असा तीन दिवसांचा महोत्‍सवादरम्‍यान 1111 श्री भक्‍तांचा महापारायण सोहळा कृष्‍णाजींचा मळा, श्री क्षेत्र शेगाव येथे पार पडला. या सोहळ्यात श्रींच्‍या अद्भूत व अलौकिक कृपाप्रसादाने पुलकित असलेली सुरभी सुनील ढगे यांनी विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण केले.

कृष्‍णाजींचा हा मळा म्‍हणजे गजानन महाराजांच्‍या पंचतत्‍वावरच्‍या स्‍वामीत्‍वाची साक्ष असलेला मळा आहे. या मळ्यात सुरभी ढगे या मुलीने इतक्‍या लहान वयात विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण करणे हे एक आश्‍चर्य असे सांगताना धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज म्‍हणाले, ज्‍या लोकांना गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत आहे, ते सर्व दासगुरूंची अवतार आहेत.

धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराजांनी श्री गजानन महाराजांचे अनेकांना आलेले अलौकिक अनुभव विशद केले. ते म्‍हणाले, ‘ओम गजानन, श्री गजानन, जय गजानन, जय जय जय’ हा मंत्र मला नर्मदामायीच्‍या पात्रातून मिळाला. तेव्‍हापासून मी त्‍याचा अखंड जप करत असून अनेक अलौकिक अनुभव मला आले आहेत.

श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त श्री कृष्णाजी पाटील यांचे वंशज श्री शैलेन्द्र पाटील व सौ. पाटील हे ह्या त्री दिवसीय सोहळ्याचे मुख्य यजमान होते. त्यांच्या हस्ते कुमारी सुरभी सुनील ढगे व तिच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोहळ्यातील सर्व सेवेकरांचा सत्कार करण्यात आला.

ज्या मळ्यात हा सोहळा संपन्न झाला , त्याचे श्री शैलेन्द्र पाटील व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार प पू. सद्गुरु दास महाराजांच्या हस्ते झाला . ह्या संपूर्ण सोहळ्याचे संचालन पारायण सेवा समितीचे प्रमुख श्री प्रमोद कराळे यांनी केले. त्यांचा ही सत्कार करण्यात आला. आरती व महाप्रसादाने ह्या सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाला हजारोंच्‍या संख्‍येने भाविक उपस्‍थ‍ित होते.

संबंधित पोस्ट

आकाशात पाहायला मिळाला दुर्मिळ योग; चंद्राच्या मागे अदृश्य झाला सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र…

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा….नर्मदे हर ।।

vishwatmaklokswamivarta

पर्जन्यदेवतेच्या प्रार्थनेने सुरू केली की देह मंदिर

माणूस जन्माला येतो पण जगायचं कुणासाठी !निजात्मप्राप्ती लागोनी I देवे दिधली मनुष्ययोनी I I

vishwatmaklokswamivarta

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

भारतातील एकमेव उभा शंकर पार्वती मंदिर**अनोखा उभा शंकर पार्वती विवाह सोहळा*