अनाधिकृत बांधकामांना कल्याण डोंबिवली महापालिकेचे अभय. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते याचे आझाद मैदानात उपोषण आजही सुरूच…
आझाद मैदान प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत,ह प्रभाग क्षेत्र, डोंबिवली पश्चिम,कुभारखाण पांडा खंडोबा मंदिर जवळ,( शिव सावली) खाडीकिनारी हारीतपट्ट्यात बोगस कागदोपत्री अधारे महारेरा, कडोंमपा बोगस परवानग्या घेऊन अनाधिकृत सदानिका विक्री -खरेदी दुय्यम निबंधक कल्याण येथे रजिस्ट्रेशन केले जात आहे.सदरचे निकृष्ट दर्जाचे कुमकवत अनाधिकृत इमारतीचे बांधकामांखाली लोक गाडुन मेले तरी कल्याण डोंबिवली महापालिका अधिकार्याना फरक पडणार नाही. कोण अभय देत आहे या भ्रष्टाचारास.. अधिकारी कोमात विकासक जोमात. या सर्वांवर कारवाई होऊन चौकशी करण्यात यावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते विनोद गंगाराम जोशी हे उपोषणाला बसलेले आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरण उपोषण सुरूच राहणार असे ते म्हणाले